विभागीय ज्युडो कराटे स्पर्धेत दिशा भोसले प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:59 PM2019-11-12T12:59:26+5:302019-11-12T12:59:38+5:30
नांदूरवैद्य : जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत ज्युडो कराटे क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी दिशा तानाजी भोसले हिने विभागीय कराटे क्रि डा स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावत नेत्रदीपक कामिगरी केली असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
नांदूरवैद्य : जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत ज्युडो कराटे क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील आदर्श कन्या विद्यालयात शिकणारी दिशा तानाजी भोसले हिने विभागीय कराटे क्रि डा स्पर्धेत प्रथम क्र मांक पटकावत नेत्रदीपक कामिगरी केली असून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रि डा स्पर्धेचे धुळे येथील जिल्हा क्रि डा संकुल येथे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला होता. दिशा भोसले हिने १७ वर्षाखालील ५६ किलो वजनीगटात घोटी येथील आदर्श कन्या विद्यालयाच्या वतीने प्रतिनिधित्व करत ज्युडो कराटे स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत विशेष कामगिरी करत स्पर्धेत प्रथम
क्र मांक पटकावला आहे. त्याचप्रमाणे याच स्पर्धेत १९ वर्षाखालील ४४ किलो वजनीगटात ज्युडो कराटे या क्रि डा प्रकारामध्ये खेळतांना अनुपमा भास्कर चौधरी हिने नेत्रदिपक कामगिरी बजावत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच १७ वर्षाखालील ४४ किलो वजनीगटात ज्युडो कराटे या क्रि डा प्रकारामध्ये खेळतांना हर्षाली मधुकर शेवळे हिने देखील या स्पर्धेत मेहनत घेत द्वितीय क्र मांक पटकावत चमकदार कामिगरी केली आहे. या नेञदिपक कामिगरीमुळे या तिन्हीही विद्यार्थ्यांनींचे विद्यालयाच्या वतीने मुख्याद्यापिका सोनवणे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी धामणीचे सरपंच बन्सी गोडे, उपसरपंच गौतम भोसले, मुख्याद्यापिका श्रीमती सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुभाष ठाकरे, माजी सरपंच वसंत भोसले, ग्रामपंचायतीचे सदस्य सुरेश गांगड, नामदेव भोसले, बाळू जाधव, रंजना लाड, सरला उघडे, महेंद्र पगारे, रंजना आगिवले, नंदा उघडे आदींनी तिन्हीही विद्यार्थ्यांनींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.