थेट नगराध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Published: November 13, 2016 10:58 PM2016-11-13T22:58:06+5:302016-11-13T23:06:19+5:30

मनमाड : दोन अपक्षांसह आठ उमेदवार रिंगणात

Directly elected as City President | थेट नगराध्यक्षपदासाठी चुरस

थेट नगराध्यक्षपदासाठी चुरस

Next

गिरीश जोशी  मनमाड
माघारीनंतर मनमाड नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांची संख्या मोठी आहे. मनमाड पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार रिंंगणात असून, यामध्ये शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, एमआयएमआयएम यासह दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
युती व आघाडीच्या चर्चा फिसकटल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याने युती व आघाडी होऊ शकली नाही. सर्वांनीच स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी दंड थोपटले आहेत.
थेट नगराध्यक्षपदासाठी पद्मावती धात्रक (शिवसेना), हिना शेख (कॉँग्रेस), रुपाली पगारे (राष्ट्रवादी), कुसुम दराडे (भाजपा), सबिहा सोनावाला (एआयएमआयएम) सुजाता शिनगारे (बसपा), सुषमा तिवारी (अपक्ष), वैशाली दहीवले (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
मोठ्या संख्येने निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवार असल्याने राजकीय नेतेमंडळींना तिकीटवाटपासाठी तारेवरची कसरत करावी लागली. सर्व पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेताना त्याच्या आर्थिक स्थितीचा तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेऊन उमेदवाऱ्या जाहीर केल्या. यामध्ये काही पक्षबदल केलेले उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उभ्या असलेल्या पद्मावती धात्रक या माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या पत्नी असून, तीन वेळा मनमाड पालिकेचे नगराध्यक्ष असलेले गणेश धात्रक यांच्या त्या मातोश्री आहे. गेल्या वेळी धात्रक यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली असली तरी गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाकडून उभ्या असलेल्या कुसुम दराडे या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दराडे यांच्या मातोश्री आहे. कॉँग्रेसकडून उभ्या असलेल्या हिना शेख या गेल्या १५ वर्षांपासून कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष असलेले अफजल शेख यांच्या स्नुषा आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रुपाली पगारे यांनी पाच वर्ष नगरसेवकपदाची जबाबदारी सांभाळलेली असून राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या त्या पत्नी आहे. मनसेच्या माजी नगरसेवक सबिहा सोनावाला एमआयएमआयएमच्या उमेदवार आहेत. मनमाड बचाव समितीकडून पुरस्कृत करण्यात आलेल्या अपक्ष उमेदवार सुषमा तिवारी यांच्यासह सुजाता शिनगारे, वैशाली दहीवले यांनीही निवडणुकीत रंग भरला आहे.

Web Title: Directly elected as City President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.