२७ पोलिसांना महासंचालक पदक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 01:40 AM2021-05-03T01:40:17+5:302021-05-03T01:41:25+5:30

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत  ७९९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदके  जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील २७ पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. 

Director General's Medal announced for 27 policemen | २७ पोलिसांना महासंचालक पदक जाहीर

२७ पोलिसांना महासंचालक पदक जाहीर

Next
ठळक मुद्देसन्मान : शहरातील प्रत्येकी ५ हवालदार व नाईक यांचा समावेश

नाशिक : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात कार्यरत  ७९९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालक सन्मान पदके  जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील २७ पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. 
नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस उपनिरीक्षकांना गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल, तर प्रत्येकी एक पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरीसाठी पदक जाहीर झाले आहे, तर नाशिक शहर पोलीस दलातील ५ पोलीस हवालदार, पाच पोलीस नाईक आणि  महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक सुनील गोसावींसह पाच जणांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पदक जाहीर झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र दिनी पोलीस आयुक्तालयातील पोलीस कवायत मैदानावर होणारा पोलीस महासंचालक पदक प्रदान सोहळा रद्द करण्यात आला होता.
शहरातील १०, तर ग्रामीणच्या ६ जणांना पदक 
नाशिक शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार सुगन बटन साबरे, पोलीस हवालदार गुलाब प्रभाकर सोनार, संतोष दत्तात्रय वाणी, यशवंत बबन खंदारे, वसंत धर्माजी पांडव, पोलीस नाईक गणेश साहेबराव निंबाळकर, प्रशांत धोंडीराम वालझाडे, मिलिंद फकिरा निकम, भूषणसिंग उदयसिंग चंदेल, प्रीती नितीन कातकाडे यांना १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.
नाशिक ग्रामीण दलातील पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुखदेव आवारी व सुनील वसावे  यांना गुन्हेगारांच्या टोळ्यांविरुद्ध केलेली कारवाईबद्दल पदक जाहीर झाले, तर नाशिक 
ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शंकर तेलुरे, मोहम्मद नजीम अब्दुल रहेमान शेख आणि सहाय्यक 
पोलीस उपनिरीक्षक अंबादास 
चनबसू जाडर, पोलीस नाईक मनोज विश्वनाथ गोसावी यांना १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले 
पीटीएच्या ६, तर एसीबीच्या तिघांचा समावेश
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस निरीक्षक सुनील देवगीर गोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम पांडुरंग पाटील, पोलीस हवालदार प्रकाश रुपचंद राठोड, मनिलाल महारु पवार, पोलीस नाईक गणेश महादेव काकड, शिवाजी भुजंग ठेंग यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक निवृत्ती तुंगार, पोलीस हवालदार दिलीप शामराव कांबळे, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिकचे पोलीस नाईक रज्जाक अली युनूस अली सैय्यद  नागरी हक्क संरक्षण विभाग, नाशिकचे पोलीस हवालदार संजीवकुमार काशी माथुर, पोलीस नाईक सुरेशसिंग छगनसिंग परदेशी यांना सेवेत सतत १५ वर्षे उत्तम कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे.
आहे. 
 

Web Title: Director General's Medal announced for 27 policemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.