विठ्ठल-रखुमाई ट्रस्टला दिशादर्शक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 12:33 AM2017-08-09T00:33:29+5:302017-08-09T00:33:55+5:30
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या वतीने राष्टÑीय स्तरावरील दिशादर्शक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये कापड बाजारातील विठ्ठल- रखुमाई मंदिर ट्रस्टला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार समाज संस्थेचे अध्यक्ष विजय बिरारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नाशिक : अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या वतीने राष्टÑीय
स्तरावरील दिशादर्शक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. यामध्ये कापड बाजारातील विठ्ठल- रखुमाई मंदिर ट्रस्टला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार समाज संस्थेचे अध्यक्ष विजय बिरारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे संपूर्ण भारतभर काम चालते. संस्थेच्या अनेक शाखा देशभर कार्यरत आहेत. विविध उपक्रमांद्वारे समाजाच्या उत्थानाचे काम करणाºया संस्था आणि व्यक्तींना संस्थेच्या वतीने दिशादर्शक पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. त्यात नाशिकच्या कापड बाजारातील विठ्ठल- रखुमाई मंदिर ट्रस्टला प्रथक क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला तर द्वितीय पुरस्कार नाशिकरोड येथील बहुद्देशीय उत्कर्ष मंडळाला प्रदान करण्यात आला. सिडकोतील उत्कर्ष मंडळ तसेच हितवर्धक मंडळालाही सन्मानित करण्यात आले. महिला विभागात नाशिकरोड येथील बहुद्देशीय उत्कर्ष महिला मंडळ, गंगापूररोडवरील सांस्कृतिक मंडळ तसेच जिल्हाध्यक्ष शोभा बोरसे, महिला विभागात वैयक्तिक गटात नाशिकच्या सीमा शिंपी, पुरुष विभागात राजेंद्र खैरनार, प्रवीण देवरे यांना सन्मानित करण्यात आले. उपनगर येथील इच्छामणी लॉन्समध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला ट्रस्टचे अध्यक्ष योगेश पवार, संदीप खैरनार, अमर सोनवणे, हेमंत सोनवणी, अजय कापडणे, महेंद्र जगताप, सुनील जगताप, राजेंद्र खैरनार, सोनल मांडगे, अंजली सोनवणी, पल्लवी कापडणी, प्रफुल्लता सोनवणी, सीमा शिंपी, स्वाती बागुल आदी उपस्थित होते.