सरळसेवेने नियुक्त अधिकाऱ्यांचा गावात मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 12:43 AM2019-12-25T00:43:33+5:302019-12-25T00:48:12+5:30
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेत नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाऱ्यांच्या ५५ जणांची तुकडी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये राहून जिल्हा प्रशासकीय आणि पंचायत राज कामांचा अनुभव घेणार आहे. या प्रशिक्षणात उमेदवार गावाच्या परंपरेपासून ते शासकीय योजनांचा अभ्यास करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे सरळसेवेत नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाऱ्यांच्या ५५ जणांची तुकडी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये राहून जिल्हा प्रशासकीय आणि पंचायत राज कामांचा अनुभव घेणार आहे. या प्रशिक्षणात उमेदवार गावाच्या परंपरेपासून ते शासकीय योजनांचा अभ्यास करणार आहे.
लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने नियुक्त झालेल्यांसाठी पुण्याच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) येथे एकत्रित परीविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्र म आयोजित केला जातो. दोन वर्षांचे हे प्रशिक्षण प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित असून, त्यामध्ये एक आठवड्यात ग्रामीण भागातील प्रशिक्षण व आदिवासी भागातील गाव प्रशिक्षण यांचा समावेश असतो. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात ५५ परिविक्षाधीन अधिकारी दाखल झाले असून, ते जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडाभर मुक्कामी राहून अभ्यास करणार आहेत. या अधिकाºयांना दिलेल्या गावात तेथील जनजीवन, संस्कृती, आहार-विहार, नैसर्गिक, भौगोलिक परिस्थिती आणि शासकीय योजनांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानुसार दि. २३ ते २९ या कालावधीत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रायते, बोरीपाडा, इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते, शेणवड, सुरगाणा तालुक्यातील माणी, खुंटविहीर आणि कळवण तालुक्यातील चणकापूर, मोहनदरी तसेच खर्डे दिगर या गावांमध्ये प्रशिक्षणार्थी अधिकारी अभ्यास करणार आहेत.
परीविक्षाधीन अधिकाºयांमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, सहायक गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे.
अखिल भारतीय सेवेतील अधिकाºयांच्या प्रशिक्षणासाठी ज्याप्रमाणे कार्यक्र म राबविला जातो त्याचप्रमाणे गाव भेटीतील कार्यक्र मांची आखणी करण्यात आलेली आहे. दिलेल्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी संबंधित गावचे तलाठी व ग्रामसेवक यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.राज्यात १५२ प्रशिक्षणार्थीलोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा परीक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्त झालेल्या गट-अ अधिकाºयांसाठी पुणे येथील यशदामध्ये सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी सध्या १५२ प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. दोन वर्षांच्या या अभ्यासक्र मात गावागावात जाऊन जीवनशैलीचा अभ्यास करण्यासाठी नाशिक जिल्ह्यात ५५ प्रशिक्षणार्थी सोमवारी रवाना झाले आहेत. तत्पूर्वी त्यांना अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी मार्गदर्शन केले.