गंगापूररोडवर घाणीचे साम्राज्य; रोगराई पसरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 12:38 AM2019-11-25T00:38:12+5:302019-11-25T00:38:55+5:30
गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
गंगापूर : गोवर्धन-गिरणारे रस्त्यावर मोठमोठे कचऱ्याचे ढीग साचले असून, यामुळे परिसरातील नागरिक, येणाºया-जाणाºया वाहनांना व त्यातील प्रवाशांना घाणीच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, परिसरातील नागरिकांना त्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विशेष बाब म्हणजे हे सर्व कचºयाचे ढीग ग्रामपंचायतीच्या कार्यालयाशेजारीच असल्याने ग्रामपंचायतीचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
नाशिक महापालिकेची हद्द संपताच गोवर्धन ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. गोवर्धन ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठ्या शिक्षण संस्था तसेच वाइन उद्योग असल्याने येथील ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे मोठे हातभार लागल्याचे दिसते. मात्र ग्रामपंचायतीच्या परिसरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात दिसून येते. गोवर्धन गिरणारेच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे कचºयाचे ढीग साचले असून त्यामुळे परिसरातील नागरिकांना व येणाºया-जाणाºया नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यामुळे गावात रोगराई पसरली असून, अनेक जणांना दवाखान्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मात्र हे सर्व व्यवस्थापनात संपूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे दिसते. ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. कचºयाच्या ढिगाºयाच्या बाजूलाच उद्योगाचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची इमारत असल्याने त्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गोवर्धन गावाला स्वच्छतेच्या बाबतीत मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत, मात्र काही गावांतील व्यवस्थापन शून्य अनुभव असलेल्या ग्राम विकास अधिकाऱ्यांमुळे गावाचे नाव संपूर्णपणे बदनाम होताना दिसते. रोडवर घरातील ओला व सुका कचरा रस्त्यात पडलेला दिसतो. यामुळे नागरिकांना साथीच्या रोगाचा सामना करावा लागत असून, परिसरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरच परिसरातील नागरिक कचरा टाकतात त्याची दुर्गंधीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो.
कचºयाच्या ढिगांमुळे श्वान, वराह आदी जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर याठिकाणी वाढल्याने रोगराई वाढते त्यामुळे नको त्या आजाराने नागरिक त्रस्त होऊन दवाखान्याच्या चकरा मारतात. या संपूर्ण परिसराची नागरिकांनी स्वच्छतेची मागणी केली आहे.