घोरवड घाटात घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:14 AM2021-03-14T04:14:03+5:302021-03-14T04:14:03+5:30
--------------- विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपरिषद व ...
---------------
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने दखल घेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अंशत: लॉकडाऊन केल्यानंतर प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उचलला आहे.
------------------
माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
सिन्नर: तालुक्यातील दोडी येथील श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूलच्या मार्च १९९७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्याला ज्या शाळेने मोठे केले त्या शाळेचे आपण देणे लागतो या उद्देशाने सर्व विद्यार्थ्यांशी संपर्क साधत यशस्वी नियोजन केले. माजी शिक्षक एम. बी. कोराळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात कोरोनोचे संकट असतानासुद्धा शाळेसाठी काही करण्याची जिद्द मनाशी बाळगून सर्व एकत्र आल्याचे कौतुक पी. डी. विंचू यांनी केले.
----------------
कुंदेवाडी येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
सिन्नर : कोरोना काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कुंदेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. आरोग्य अधिकारी डॉ. शीतल गाडे, आरोग्यसेविका ए. आर. तवर, एस. डी.जाधव, आशा सेविका सुमन दोडके, अर्चना नाठे, आशा जगताप, ललिता साळंके, अंगणवाडी कार्यकर्ती अनुराधा माळी, मनीषा नाठे, वैशाली गोळेसर, अंगणवाडी मदतनीस कल्पना भालेराव, सिंधू माळी, ग्रामविकास अधिकारी एस. बी. पवार, लिपिक आर. बी. माळी, सफाई कर्मचारी सतीश पिंपळे या सर्व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
---------------
वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण
सिन्नर : शहर व तालुक्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसापासून हवामानात कमालीचा बदल झाला आहे. दिवसभर उष्मा जाणवत असून पहाटे थंडी पडत आहे. दिवसभर ऊन, रात्री व पहाटे थंडी असे विचित्र हवामान सध्या आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. सर्दी, खोकला, ताप असे रूग्ण वाढत आहेत.