‘व्हॉट्स अ‍ॅप’वर गंदी बात

By admin | Published: June 24, 2014 08:24 PM2014-06-24T20:24:56+5:302014-06-25T00:17:10+5:30

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर गंदी बात

Dirty talk on 'What's App' | ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर गंदी बात

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर गंदी बात

Next

 

नाशिक, दि. २४ : अगदी काही वर्षांपूर्वीच ‘व्हॉट्स अ‍ॅप’ या सॉफ्टवेअरचा उदय झाला अन् पाहता पाहता त्याने सर्व तरुणाईला आपल्या कवेत घेतले. संवादाच्या या नव्या तंत्राचा अनेकांना मोठा फायदादेखील झाला; मात्र काही वाट चुकलेल्या युवकांनी याचा वापर चुकीच्या कामांसाठी करण्यास सुरु वात केली आहे. आता तर व्हॉट्स अ‍ॅपवरील ग्रुपच्या माध्यमातून अश्लील फोटो तसेच संभाषण ‘शेअर’ करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने तरुणींनी अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.फॉरवर्ड करणे
धोकादायक
नवीन तंत्रज्ञानाचा वापर अश्लील संवादासाठी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. या सॉफ्टवेअरवर मित्रमंडळींचे ग्रुप तयार करून चॅटिंग करता येते; पण काही जण याचा वापर अश्लील मेसेज, फोटो, चित्रफीत पाठविण्यासाठी करीत आहेत. असाच एक प्रकार नाशिकमध्येही घडला. एका मुलीला तिच्या नातेवाइकाने व्हॉट्स अ‍ॅपवर मॅसेज पाठवला व तो पुढे किमान दहा ते पंधरा जणांना पाठव, असे त्यात लिहिले होते. विशेष म्हणजे, यामध्ये अश्लील मजकूर होता. त्या मुलीने तो वाचला म्हणून ठीक, न वाचताच जर पुढे व्हॉट्स अ‍ॅप युजर्सला फॉरवर्ड केला असता तर लोकांनी तिच्याबद्दल काय विचार केला असता याची कल्पनाच न केलेली बरी. त्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप वापरताना सावधानता बाळगावी. तसेच आलेला मजकूर वाचूनच इतरांना फॉरवर्ड करावा.
मुलीही आघाडीवर
या सॉफ्टवेअरचा उपयोग फक्त मुलेच करतात असे नाही. मुलीदेखील मोठ्या प्रमाणात याचा वापर करीत आहेत. त्यांचेदेखील ग्रुप आहेत; पण या ग्रुपमध्ये नेमकी कशाची देवाणघेवाण केली जाते, हे पाहिले असता त्याही मुलांपेक्षा वेगळे काही करीत नाहीत, हेच दिसून आले. यामुळे मुलींचादेखील मोठा सहभाग या प्रकरणात दिसून येतो. कुठल्याही तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करण्यापेक्षा त्याचा फायदा कसा घ्यायचा हे शिकता आले पाहिजे तरच तंत्रज्ञान वरदान ठरते.
‘व्हॉट्स अ‍ॅप’चा
वापर वाढला
आज अनेक जण मोठ्या प्रमाणावर व्हॉट्स अ‍ॅप वापरू लागले आहेत. पोलिसांनादेखील वायरलेसपेक्षा व्हॉट्स अ‍ॅप फायद्याचे ठरत आहे; पण त्याचा दुरु पयोगदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे, यावर मात्र या सॉफ्टवेअर कंपनीकडून काहीही पर्याय नाही, तसेच पोलीस प्रशासनदेखील यामध्ये काही करू शकत नसल्याने अशा दिशाहीन झालेल्या युवकांना थांबवणार तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकानेच असे प्रकार थांबविले पाहिजेत.
कट्ट्यांवरदेखील व्हॉट्स अ‍ॅप
अनेक विद्यार्थी कॉलेज-क्लासच्या नावाने घराबाहेर पडतात; पण कॉलेज-क्लासमध्ये जाण्याऐवजी ते कट्ट्यावर बसून राहतात. त्यांच्या या घोळक्यात अशाच प्रकारच्या चर्चेला उधाण आलेले असते. कोणी कुठला व्हिडीओ, फोटो किंवा एखादा अश्लील एसएमएस शेअर केला याचीच अधिक चर्चा होते. विशेष म्हणजे याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याने व्हॉट्स अ‍ॅपवर चर्चांना उधाण आले आहे.
खोट्या निधन वार्ता
फॉरवर्ड करण्याच्या नादात अनेक सन्माननीय व्यक्तींचे निधन झाल्याचे मेसेजेस कुठलीही खातरजमा न करता फॉरवर्ड केल्या गेल्या आहेत. तर काही युजर्स हेतुपुरस्सर अशा प्रकारच्या निधन वार्ता पसरवून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Dirty talk on 'What's App'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.