दिव्यांगांची चाचणी, लसीकरणाला प्राधान्य देण्याचे आदेश; मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:25+5:302021-05-15T04:14:25+5:30

नाशिक: दिव्यांग व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या मर्यादा लक्षात घेऊन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने कोरोना चाचणी तसेच लसीकरणासाठी ...

Disability testing, order to prioritize vaccination; But neglecting implementation | दिव्यांगांची चाचणी, लसीकरणाला प्राधान्य देण्याचे आदेश; मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

दिव्यांगांची चाचणी, लसीकरणाला प्राधान्य देण्याचे आदेश; मात्र अंमलबजावणीकडे दुर्लक्ष

Next

नाशिक: दिव्यांग व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेच्या मर्यादा लक्षात घेऊन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने कोरोना चाचणी तसेच लसीकरणासाठी दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था करून त्यांना प्राधान्य देण्यात यावे, याबाबतचे आदेश काढले आहेत. मात्र अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नसल्याने दिव्यांग बांधवांची परवड होत असल्याचे जिल्ह्यात दिसून आले आहे.

गेल्या ३ मे रोजी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला याबाबतचे आदेश पाठविले आहेत. त्यात म्हटले आहे की, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता त्यांच्या आजाराची दखल घेऊन त्यांना उपचारासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत कोविड आजाराची परिस्थिती लक्षात घेता दिव्यांगांना टेस्टिंग, उपचार तसेच लसीकरणाकरिता प्राधान्य दिले गेले पाहिजे. दिव्यांगांना रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामोरे जावे लागत आहे.

दिव्यांग व्यक्तीची रोगप्रतिकारकशक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकिशी चांगली नसल्याने त्यांना कोविड -१९ विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यांना रांगेत उभे राहाण्याचे कष्टप्रद ठरते. त्यामुळे कोविडकरिता करण्यात येणारे टेस्टिंग, लसीकरण तसेच उपचारासाठी प्राधान्य देण्याच्या सूचना केंद्राच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे राज्यांना कळविले आहे. त्यानुसार राज्यांनी या संदर्भातील प्रत्येक केंद्राला याबाबची माहिती कळविली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात स्वतंत्र व्यवस्था किंवा प्राधान्य देण्याबाबतची कार्यवाही होत नसल्याचे दिसते.

-- इन्फो--

नोंदणीकृत दिव्यांग संख्या

२५,०००

ग्रामीण भागातील दिव्यांग

१६,०००

नाशिक मनपा हद्दीतील दिव्यांग

९०००

---इन्फो--

१) १९८० ते १९९५ या कालावधीपर्यंत पोेलिओचे प्रमाण अधिक असल्याने या काळात जन्मलेल्या पोलिओग्रस्त दिव्यांगांची संख्या यात मोठी आहे.

२) ७० टक्के दिव्यांग हे १८ वर्षापुढील आहेत.

-कोट--

केंद्र व राज्य सरकारने दिव्यांगांना कोविड लस प्राधान्याने देण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाने दिव्यांगांना लस देण्याबाबतचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे गर्दीमुळे दिव्यांगांना माघारी परतावे लागते. प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईचा फटका दिव्यांग बांधवांना बसत आहे.

- बबलू मिर्झा, अध्यक्ष, दिव्यांग कल्याण संघटना.

(फोटो: एनएसकेला)

--कोट--

मी बहुविकलांग असून मी कोविड लस घेण्यासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात गेलो असता दीर्घ प्रतीक्षेनंतर परत पाठविण्यात आले. दिव्यांगांसाठी विशेष कोणतीही व्यवस्था तेथे करण्यात आलेली नाही.

- विजय पाटील, पंचवटी.

--कोट--

मागील आठवड्यात रंगारवाडा मनपा रुग्णालय बुधवारपेठ येथे लस घेण्यासाठी गेलो असता रांगेतल्या सर्वांना गेटमध्ये घेण्यात आले. मी दोन्ही पायांनी दिव्यांग असल्याने आत जाऊ शकलो नाही. विनवणी केल्यावर त्यांनी आतमध्ये घेतले. स्वतंत्र व्यवस्था असती तर परवड झाली नसती.

- ऋषिकेश सोनार, चव्हाटा.

Web Title: Disability testing, order to prioritize vaccination; But neglecting implementation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.