अपुऱ्या बसेसमुळे आडगाव परिसरातील विद्यार्थ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:23 PM2019-12-17T23:23:21+5:302019-12-18T00:53:03+5:30
आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयांत शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बससेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शहरात येणाºया बसफेºया वाढवाव्यात, अशी मागणी आडगाव ग्रामस्थांनी केली आहे.
पंचवटी : आडगाव येथून नाशिक शहरात असलेल्या विविध शाळा तसेच महाविद्यालयांत शिक्षणासाठी येणाºया तसेच चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाची बससेवा असली तरी बसेसची संख्या अपुरी असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. एसटी प्रशासनाने आडगावातील शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी शहरात येणाºया बसफेºया वाढवाव्यात, अशी मागणी आडगाव ग्रामस्थांनी केली आहे.
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या आडगावातून दररोज असंख्य विद्यार्थी तसेच चाकरमाने कामासाठी नाशिक शहरात येत असतात. मात्र बस फेऱ्यांची संख्या अपुरी असल्याने बसमध्ये प्रवाशांना गर्दीत प्रवास करावा लागतो. काही दिवसांपूर्वी धावत्या बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना काही विद्यार्थी बसमधून पडून जखमी झाल्याची घटना घडली होते.
आडगाव येथून नाशिकला येणाºया अनेक बस कधी कधी बंद पडत असल्याने विद्यार्थी तसेच नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अन्य प्रवासी वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. आडगावपासून शहरातील शाळा सात ते आठ किलोमीटर अंतरावर असल्याने अनेक पालकांना आपल्या मुलांना दुचाकीवरून शाळा तसेच महाविद्यालयापर्यंत नेऊन पोहोचिवण्याचे काम करावे लागते.
आडगावातून नाशिक शहरात बस येत असल्या तरी त्यातील काही बस बंद पडत असल्याने विद्यार्थी व प्रवाशांना धक्का मारावा लागत असण्याचे चित्र बघायला मिळते. आडगावातील लोकसंख्या लक्षात घेऊन एसटी प्रवास करण्यासाठी एसटी प्रशासनाने आडगाव ते नाशिक शहरात येणाºया बसच्या फेºया वाढविण्याची गरज आहे.