पिंपळस-नैताळेदरम्यानदुभाजक तोडल्याने वाहनचालकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:45 PM2017-12-14T23:45:36+5:302017-12-15T00:23:40+5:30
पिंपळस (रामाचे ) ते नैताळे यादरम्यान नाशिक-औरंगाबाद रोडवरील अनधिकृतरीत्या तोडलेले दुभाजक तातडीने दुरुस्त न केल्यास तोडलेल्या दुभाजकात वृक्षारोपण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने निफाडचे प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक- औरंगाबाद रस्त्यावर निफाड ते पिंपळस (रामाचे) ते नैताळे या १२ किमी अंतराच्या दरम्यान विविध व्यावसायिक, नागरिकांनी अनधिकृतरीत्या ४० ते ४५ दुभाजक तोडल्याने या रस्त्यावर सातत्याने वाहनांचे अपघात वाढले
निफाड : पिंपळस (रामाचे ) ते नैताळे यादरम्यान नाशिक-औरंगाबाद रोडवरील अनधिकृतरीत्या तोडलेले दुभाजक तातडीने दुरुस्त न केल्यास तोडलेल्या दुभाजकात वृक्षारोपण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने निफाडचे प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला प्रांत महेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक- औरंगाबाद रस्त्यावर निफाड ते पिंपळस (रामाचे) ते नैताळे या १२ किमी अंतराच्या दरम्यान विविध व्यावसायिक, नागरिकांनी अनधिकृतरीत्या ४० ते ४५ दुभाजक तोडल्याने या रस्त्यावर सातत्याने वाहनांचे अपघात वाढले असून, जीवितहानीचे प्रमाण वाढल्याने निफाड तालुक्यातील प्रवाशांत चिंतेचे व संतापाचे वातावरण पसरले आहे. या प्रश्नावर राजकीय नेतेही गप्प असल्याने जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवाय निफाड ते माडसांगवी या दरम्यान नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर प्रचंड संख्येने गतिरोधक बसविल्याने वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. उलट या गतिरोधकांमुळे अपघातात वाढ झाली आहे. या रस्त्यावरील सदर दुभाजक तातडीने दुरुस्त करावे आणि अनावश्यक गतिरोधक काढून टाकावे अन्यथा तोडलेल्या दुभाजकांत वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष उत्तम निरभवणे, संतोष पगारे, मोहन आरोटे, अनिल शिंदे, राजेंद्र दिवेकर, संजय शिंदे, सागर खडताळे, मनोज खडताळे, जितू गवारे, किरण जाधव, राजेंद्र जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.