रस्त्याच्या कामामुळे गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:08 PM2020-01-22T22:08:53+5:302020-01-23T00:14:15+5:30

पिंपळगाव-वणी-सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याची उंची अधिक असताना त्याला जोडणारे उपरस्ते कमी उंचीचे असल्याने ते जोडण्याचे काम योग्य पद्धतीने न केल्याने वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे.

Disadvantages due to road work | रस्त्याच्या कामामुळे गैरसोय

रस्त्याच्या कामामुळे गैरसोय

googlenewsNext
ठळक मुद्देवणी-सापुतारा रस्ता : अपघातांच्या श्रृंखलेमुळे प्रवासी त्रस्त

दिंडोरी : पिंपळगाव-वणी-सापुतारा या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदर रस्त्याची उंची अधिक असताना त्याला जोडणारे उपरस्ते कमी उंचीचे असल्याने ते जोडण्याचे काम योग्य पद्धतीने न केल्याने वाहनधारकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहे. त्वरित रस्त्यांची योग्य जोडणी करून अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मावडी ग्रामपंचायतीने वारंवार राष्ट्रीय महामार्ग व संबंधित ठेकेदार यांच्याकडे मावडी फाटा रस्त्याची योग्य जोडणी करण्यासाठी पत्रव्यवहार केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सदर रस्त्याची योग्य पद्धतीने जोडणी करण्यासह मार्गदर्शक सूचनाफलक लावावे, अशी मागणी मावडीच्या नागरिकांनी केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मार्गदर्शक सूचना फलक लावण्याची मागणी
पिंपळगाव बसवंत-वणी-सापुतारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्याने सदर रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. संपूर्ण रस्त्याचे काँक्रि टीकरण होत आहे. सदर रस्त्याचे नूतनीकरण, मजबुतीकरणात रस्त्याची उंची वाढली आहे. मात्र सदर रस्त्याला जोडणाऱ्या विविध गावांच्या रस्त्यांची उंची कमी आहे. त्यामुळे महामार्गावर जाताना अडचणी येत आहे. सदर रस्ता होत असताना रस्त्याला जोडणाºया उपरस्त्यांची समांतर जोडणी होणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व उपरस्त्यांना जोडावे अशी मागणी होत आहे. ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे तेथे मार्गदर्शक सूचनाफलक उभारावे, रस्त्याला पट्टे मारावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Disadvantages due to road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.