सिडकोत विजेचा दाब वाढल्याने उपकरणांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:35 PM2020-01-09T12:35:54+5:302020-01-09T12:47:09+5:30
सिडको : विजेचा दाब अचानक वाढल्याने गुरु वारी (दि.९) सकाळी सिडकोतील उत्तमनगर ,शिवपुरी चौक व परिसरातील दीडशे ते दोनशे नागरीकांच्या घरातील कॉम्प्युटर ,मिक्सर, चार्जर ,सेट टॉप बॉक्सह विधुत उपकणाचे नुकसान झाले. संतप्त नागरिकांनी सिंबायोसिस येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव घालत नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

सिडकोतील उत्तमनगर ,शिवपुरी चौक, भगवती चौक, बुद्धीविहार समोरील परिसरात गुरु वारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास विजेचा दाब अचानक वाढल्याने दीडशे ते दोनशे नागरिकांचे विद्युत उपकरणे जाळले. याच परिसरात चार वेळेस अशी घटना घडल्याने नगरसेवक रत्नमाला राणे,मुकेश शहाणे,भूषण राणे,संजय भामरे यांच्या नेतृत्वाखाली नुकसान झालेल्या नागरिक थेट सिम्बॉयिसीस येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करीत अधिकाऱ्यांना घेराव घातला. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत कार्यालयातून बाहेर न जाण्याचा निर्णय घेतल्याने याबाबत अधिका-यांनी वरिष्ठांशी चर्चा जरून नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
याप्रकारातील दीडशे ते दोनशे नागरीकांच्या घरातील कॉम्प्युटर ,मिक्सर, चार्जर ,सेट टॉप बाक्स,वॉशिंग मशीन झेराक्स मशीन यासह विधुत उपकणाचे नुकसान झाले.