शेतकºयांचे नुकसान : खरेदी-विक्री संघ आक्रमक गुदामाअभावी मका खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 11:53 PM2017-11-09T23:53:38+5:302017-11-10T00:02:32+5:30

शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदी करून साठवायचा कोठे, असा प्रश्न येवला खरेदी - विक्री संघाला पडल्याने संघाच्या चेअरमन व संचालकांनी येवला तहसीलदाराना गुदाम उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले आहे. नायब तहसीलदार सविता पठारे यांनी निवेदन स्वीकारले.

Disadvantages of Farmers: Purchase and sale teams stop purchasing maize due to aggressive bills | शेतकºयांचे नुकसान : खरेदी-विक्री संघ आक्रमक गुदामाअभावी मका खरेदी बंद

शेतकºयांचे नुकसान : खरेदी-विक्री संघ आक्रमक गुदामाअभावी मका खरेदी बंद

Next
ठळक मुद्देगुदाम उपलब्ध करून देण्याचे निवेदन मक्याची अद्याप विल्हेवाट नाहीगुदाम मिळण्याकामी सकारात्मक प्रतिसाद

येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेंतर्गत मका खरेदी करून साठवायचा कोठे, असा प्रश्न येवला खरेदी - विक्री संघाला पडल्याने संघाच्या चेअरमन व संचालकांनी येवला तहसीलदाराना गुदाम उपलब्ध करून देण्याचे निवेदन दिले आहे. नायब तहसीलदार सविता पठारे यांनी निवेदन स्वीकारले.
खरेदी केलेला मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध नसल्याने मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी उशीर होत असून, गुदाम उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. गेल्या वर्षी शासकीय योजनेंतर्गत खरेदी झालेल्या मक्याची अद्याप विल्हेवाट लागलेली नाही. या मक्यानेच गुदामाची जागा व्यापली आहे. या शिवाय अंदरसूल कृषी उपबाजार समिती गुदामामध्ये येवला तहसील कार्यालयाने रेशनिंगचा गहू व तांदूळ साठवला आहे. शासकीय मका खरेदीसाठी येवला तहसील कार्यालयाकडून गुदाम मिळण्याकामी सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने तालुका खरेदी-विक्री संघ अध्यक्ष भागुनाथ उशीर यांच्यासमवेत सर्व संचालक मंडळाने तहसील कार्यालयाचा दरवाजा ठोठावत मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. मक्याचे सध्याचे बाजारभाव व शासकीय आधारभूत किमतीत क्विंटलला ४०० ते ४५० रुपयांचा फरक असून, शेतकºयाला आज मका विक्र ीतून एकरी दहा हजार रु पयापर्यंत नुकसान होत आहे. तालुक्यातील मका उत्पादक शेतकºयांनी तालुका खरेदी- विक्री संघाकडे शासकीय मका खरेदीची मागणी केल्याने येवला तहसीलदार यांना २५ आॅक्टोबरला खरेदी-विक्री संघाने विनंती पत्राद्वारे गुदाम उपलब्धतेची मागणी केली होती. शेतकरी हितासाठी सर्व संचालक मंडळाने बुधवारी प्रत्यक्ष निवेदन देऊन चर्चा केली. गुदाम उपलब्ध करून देण्याबाबत नायब तहसीलदार सविता पठारे, पुरवठा निरीक्षक बी.ए. हावळे यांच्याशी चर्चा करून शासकीय मका खरेदीस गुदाम उपलब्ध न झाल्यास शेतकºयांचे प्रचंड नुकसान होणार असल्याचे सांगितले.

Web Title: Disadvantages of Farmers: Purchase and sale teams stop purchasing maize due to aggressive bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.