शेतकऱ्यांच्या पदरी निराशा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 06:21 PM2020-09-29T18:21:42+5:302020-09-29T18:22:04+5:30
खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे.
खेडलेझुंगे : शासनाच्या कृषी विभागाकडुन सर्व शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षाची कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु केल्याची माहीती देण्यात आलेली होती. यामध्ये ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्ट्रर, ट्रॅक्टर चलीत औजारांमध्ये रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, गर, कापणी यंत्र, फवारणी यंत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ शेतकºयांना लॉटरी पध्दतीने मिळणार आहे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी लाभार्थी शेतकºयांची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे.
यंत्र आणि अवजारे खरेदीसाठी भरपूर अनुदान मिळत असल्याने शेतकºयांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. ह्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाने पोर्टल सुरू केले आहे. मात्र हे पोर्टलच व्यवस्थित कार्यान्वीत न झाल्याने शेतकºयांची नोंदणी प्रक्रि या ठप्प झाली आहे. त्यातच शालेय विद्यार्थी आणि इतर योजनांची आॅनलाईन कामकाजाही लोड सीएससी सेंटर आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये आहे. त्यातच कृषी विभागाची साईट अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने सेंटर चालक वैतागलेले आहेत.
सरकारने शेतकºयांसाठी कृषी विभागाकडून यांत्रिकीकरण योजना सुरू केल्यापासून अनेकवेळा पोर्टलच्या कनेक्टिव्हिटीत अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने आम्ही सर्व केंद्र चालक अक्षरश: हैराण झालो आहोत. सेंटरवर / ग्रामपंचायतीमध्ये शेतकºयांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सद्या सुरु असलेल्या कोरोनाच्या पाशर््वभुमीवर संबंधित विभागाने याची दखल घेऊन ही अडचण लवकर दूर करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
- विशाल घोटेकर, सीएससी केंद्र संचालक, खेडलेझुंगे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आॅनलाईन भरण्यासाठीची पध्दत शासनाकडुन खरोखरच कौतुकास्पद आहे. परंतु त्यासाठी जी काही यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे ती अत्यंत कुचकामी आहे. आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिवस-दिवस सीएससी सेंटरवर, ग्रामपंचायतीमध्ये बसुनही अर्ज आॅनलाईन होत नसल्याने शेतकरी त्रस्त होत आहे. कोरोनाची महामारी व सद्या पडत असलेल्या सततच्या पाऊसामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना ही शेतकरी हिताच्या योजनाच्या अंमलबजावणीबाबत सरकारची उदासीनता दिसून येते ही निश्चित खेदाची आणि चिंताजनक बाब आहे.
- रामदास गोरडे, शेतकरी.