आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 12:46 AM2021-04-16T00:46:30+5:302021-04-16T00:47:00+5:30

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला सदस्यांनी राम राम ठोकल्याने खेडोपाडी गावागावात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच असून कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ग्रामआपत्ती समित्यांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Disaster Management Committees on paper | आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच

आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच

googlenewsNext
ठळक मुद्देसायखेडा : निष्क्रिय समित्यांमुळे कोरोनाचा शिरकाव

सायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहत आहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला सदस्यांनी राम राम ठोकल्याने खेडोपाडी गावागावात कोरोनाचा फैलाव होत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच असून कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ग्रामआपत्ती समित्यांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गतवर्षी ग्राम आपत्ती कमिटी स्थापन झाली. अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कमिटीने उत्कृष्टरीत्या काम केले. कोरोनाचे संकट कमी झाले, परंतु पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे ग्राम आपत्ती समित्या कार्यान्वित करण्याची गरज आहे. अनेक गावांतून ग्राम आपत्ती समितीने चांगल्या प्रकारे काम केल्याने त्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु ज्या गावांमध्ये ग्राम आपत्ती समिती कागदावरच राहिली अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. बाहेरून येणारे नागरिक, बाहेर जाणारे नागरिक व गावातील व्यवस्था यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला होता. या ग्राम आपत्ती समितीमध्ये अध्यक्ष सरपंच, सचिव तलाठी होते. तर कृषी साहाय्यक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश ग्राम आपत्ती समितीमध्ये आहे.

समित्यांमध्ये सामाजिक तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करून कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करणे, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळणे, अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी सर्वच नागरिकांनी काळजी अन‌् पुढाकार घेऊन पुन्हा ग्राम आपत्ती समित्या सक्रिय कराव्यात.
- संदीप टर्ले, माजी सरपंच, चांदोरी (१५ आपत्ती व्यवस्थापन)

Web Title: Disaster Management Committees on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.