विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:28 PM2018-09-14T18:28:46+5:302018-09-14T18:30:12+5:30
माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन विभागामार्फत सिन्नर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन विभागामार्फत सिन्नर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध विभागातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी फायर मॉक ड्रिल’ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना आग लगण्याची कारणे, आग लागल्यानंतर ती आटोक्यात आणणे, आग लागू नये म्हणून घेतले जाणारे प्रतिबंधात्मक उपाययोजना याबद्दल अग्निशामक दलाचे अधिकारी राठोड यांनी माहिती दिली. अग्निशामक दल हे नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असते आणि ते कसे वक्तशीर असते याचीही कल्पना त्यांनी दिली. विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये नक्की काय काळजी घ्यायची, इमारतीच्या वरच्या मजल्यावरील लोकांना शिडीद्वारे खाली आणणे, धातू कापणे, कॉँक्र ीट तोडणे आदींचे प्रात्यिक्षक यावेळी दाखिवण्यात आले. अग्निशामक दलाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आग ज्या जागी लागली त्याची माहिती देणे, घटनास्थळी अडकलेल्या नागरीकांना वाचिवणे यासर्व बचाव कार्याचे प्रात्यिक्षक अग्निशामक दलाच्या पथकाने सर्व विद्यार्थ्यांना यावेळी दाखविण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अग्निशामक दलातील पथकाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे दिली.
याप्रसंगी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मनोजकुमार चकोर, गटनिदेशक अर्जुन नागरे, संजय झगडे यांच्यासह विविध विभागांचे शिल्प निदेशक, सेवकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.