गंगापूर धरणातून पुन्हा विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2021 12:49 AM2021-10-04T00:49:43+5:302021-10-04T00:50:30+5:30
गेल्या ३० तारखेपासून गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे. रविवारी सकाळपासून २८५ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. सकाळी सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ७ वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आला होता.
नाशिक: गेल्या ३० तारखेपासून गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा किरकोळ स्वरूपात विसर्ग केला जात आहे. रविवारी सकाळपासून २८५ क्यूसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे. सकाळी सुरू असलेला विसर्ग सायंकाळी ७ वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे नदीपात्रात काही प्रमाणात वाढ झाली आहे. गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोसळलेल्या पावसानंतर गंगापूर धरणातून दहा हजार क्यूसेकपेक्षा अधिक विसर्ग करण्यात आला होता. तीन दिवस टप्प्याटप्याने विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. आता पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी सकाळपासून विसर्ग करण्यात येत आहे.