नऊ जणांवर हद्दपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 05:37 PM2019-03-26T17:37:49+5:302019-03-26T17:38:01+5:30
मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व महसूल प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे.
मालेगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस व महसूल प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांवर सुनावणी झाली आहे. नऊ जणांना नाशिक, धुळे, जळगाव, या तीन जिल्ह्यातून एक व दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. हिस्ट्रीशिटर गुन्हेगारांना दणका दिला जात आहे.
लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नियोजन केले आहे. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजीत हगवणे यांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे तर कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचविणाऱ्यांचा हद्दपारीचा प्रस्ताव येथील प्रांत अधिकारी तथा दंडाधिकारी शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. शर्मा यांनी या प्रस्तावांवर तातडीने सुनावणी घेत नऊ जणांना हद्दपारीच्या नोटीसा बजावल्या आहेत. हद्दपार झालेल्यांची नावे व कंसात वर्ष व जिल्ह्यांची नावे अशी, प्रभाकर उर्फ केदा गोपाळ सोनवणे रा. गिसाका वसाहत दाभाडी (एक वर्ष, नाशिक, धुळे), चेतन उर्फ हल्ल्या मच्छिंद्र सूर्यवंशी रा. संगमेश्वर (एक वर्ष, नाशिक व धुळे), मनेष दत्तात्रय शिंदे रा. रावळगाव (एक वर्ष, नाशिक व धुळे), अक्रमखान जफरखान रा. मदनीनगर (एक वर्ष, नाशिक, धुळे, जळगाव), इरफान अहमद अकील अहमद उर्फ राजू चिऱ्या (एक वर्ष, नाशिक, धुळे, जळगाव), इम्तियाज अहमद हाजी नजमुद्दीन उर्फ इम्तियाज गोली रा. म्हाळदेशिवार (एक वर्ष, नाशिक, धुळे, जळगाव), जलालुद्दीन कमालुद्दीन उर्फ आरीफ कुरैशी रा. रमजानपुरा (एक वर्ष, नाशिक, धुळे, जळगाव) उर्वरित दाखल झालेल्या प्रस्तावांवर लवकरच सुनावणी घेण्यात येणार असून त्यांच्यावरही हद्दपारीची कारवाई करणार असल्याची माहिती प्रांत अधिकारी शर्मा यांनी दिली.