शिस्त पाळली अन् कोरोनाची साखळी तुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:14 AM2021-04-10T04:14:15+5:302021-04-10T04:14:15+5:30
नवीबेजची कोरोनाबाधितांची संख्या ८३ पर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या नवीबेज गावाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ...
नवीबेजची कोरोनाबाधितांची संख्या ८३ पर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या नवीबेज गावाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी अचानक भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कळवण पंचायत समितीला भेट देऊन कोरोनाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. मानूर कोविड सेंटर व नवीबेज येथे कन्टेन्मेंट झोनची पाहणी केली.
कोरोनाबाधित रुग्णानी दिलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया व १०० टक्के गाव निर्बंध पाळत असल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी कोरोना समितीचे अध्यक्ष घनश्याम पवार, डॉ. राजेश काटे, आरोग्य सेविका सुनीता जोपले, आरोग्य सेवक दादाजी गुंजाळ व आशा वर्कर सुनीता जाधव, ग्रामविकास अधिकारी सुधाकर देशमुख व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले.
कोट.....
बाधित रुग्ण व गावातील ग्रामस्थ यांनी कन्टेन्मेंट झोनच्या नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत झाली. कोरोना नियंत्रण समिती, ग्रामस्थ, आशा वर्कर, आरोग्य सेविका तसेच गाव पातळीवरील सर्व आरोग्य व इतर कर्मचारी यांनी एकजुटीने केलेल्या कामामुळे यश आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीबेजसारखे नियोजन इतर गावांनी करावे.
- रवींद्र शिंदे,
अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
कोट......
२२ मार्च २०२१ रोजी गावात पहिला रुग्ण आढळल्यानंतर अचानक आठ दिवसांत बाधित रुग्णांची संख्या ५० च्या पुढे गेली. त्यामुळे नवीबेजमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे व्यावसायिकांनी कडक निर्बंध पाळण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी कन्टेन्मेंट झोनच्या नियमांचे पालन केल्यामुळे ८ दिवसांत साखळी तुटण्यास मदत झाली. ८३ रुग्णांचा आकडा १५ दिवसांत पाचच्या आत आला.
- घनश्याम पवार, अध्यक्ष, नवीबेज कोरोना नियंत्रण समिती
फोटो - ०९ नवीबेज कोरोना
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नवीबेज गावाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी अचानक भेट देऊन कन्टेन्मेंट झोनची पाहणी केली. समवेत घनश्याम पवार, डी.एम. बहिरम, डॉ. सुधीर पाटील आदी.
===Photopath===
090421\09nsk_14_09042021_13.jpg
===Caption===
फोटो - ०९ नवीबेज कोरोना कोरोनाचा हॉट्स स्पॉट ठरलेल्या नवीबेज गावाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी अचानक भेट देऊन कॅन्टोन्मेंट झोनची पाहणी केली. समवेत घनश्याम पवार, डी.एम.बहिरम , डॉ.सुधीर पाटील आदी.