‘साईड ब्रँच’च्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असंतोष

By admin | Published: January 31, 2016 11:11 PM2016-01-31T23:11:52+5:302016-01-31T23:13:49+5:30

महासंचालकांकडे तक्रार : जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप

Discontent among police officers of 'Said Brunch' | ‘साईड ब्रँच’च्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असंतोष

‘साईड ब्रँच’च्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असंतोष

Next

नाशिक : पोलीस खात्यात यापूर्वी साईड ब्रँच काम केल्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयात बदली झाल्यानंतर पुन्हा साईड ब्रँचला फेकण्यात आल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे़ पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याची भावना या अधिकाऱ्यांमध्ये असून, त्यातील काहींनी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांची वेळ मागून घेतल्याचे वृत्त आहे़
पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक व आर्थिक निकषांवर बदल्या केल्या जात असल्याचे साईड ब्रँचमधील अधिकारी उघडपणे बोलू लागले आहेत़ तसेच यापूर्वीही आम्ही पोलीस ठाणी सांभाळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभिप्रेत असलेली वसुली आम्हीदेखील करून देऊ शकतो, असे स्पष्टपणे सांगत असून, यातील काहींनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहारही केला आहे़
सिंहस्थानंतर पोलीस आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे यांनी विशेष शाखेत, तर विशेष शाखेतील प्रकाश सपकाळे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली़ तसेच शहरात नव्याने स्थापन झालेल्या मुंबई नाका व म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बाजीराव महाजन व नरेंद्र पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली़
सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाचक शाखेत, तर त्यांच्या जागेवर पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातून बदलून आलेले पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली़ पोलीस आयुक्तांनी या बदल्यांमध्ये साईड ब्रँचमधील पोलीस अधिकाऱ्यांचा विचारच न केल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे़ विशेष म्हणजे सद्यस्थितीत साईड ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा कारभारही सांभाळलेला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Discontent among police officers of 'Said Brunch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.