समस्या सुटेपर्यंत प्रभाग सभा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:04 AM2018-07-07T02:04:38+5:302018-07-07T02:04:58+5:30
सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभाग सभेत मांडण्यात आलेल्या समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पुढील सभा न घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
सिडको प्रभाग समितीच्या बैठकीत बोलताना नगरसेवक कल्पना पांडे. समवेत सभेस उपस्थित नगरसेवक.
सिडको : महापालिका आयुक्तांकडून नागरी कामे सुरळीत होत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य नागरिकांना भेडसवणारे प्रश्नदेखील अधिकारी मार्गी लावत नसल्याने प्रभाग सभेत सत्ताधाऱ्यासह सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, प्रभाग सभेत मांडण्यात आलेल्या समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पुढील सभा न घेण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
सिडको प्रभाग समितीची सभा सभापती हर्षा बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.६) पार पडली. यावेळी नगरसेवक डी.जी. सूर्यवंशी यांनी स्वच्छता या विषयावर सूचना करून महापालिका आयुक्त सर्व कामकाज सुरळीत होत असल्याचे सांगत असले तरी सिडकोत मात्र परिस्थिती वेगळी असून, रस्त्यावरील घाण, कचरा व पालापाचोळादेखील उचलला जात नसल्याने सिडकोच्या विकासासाठी एकत्र होण्याचे आवाहनही नगरसेवक सूर्यवंशी यांनी केले. नगरसेवक किरण गामणे यांनी प्रभागात आठ दिवसांत घंटागाडी सुरळीत न झाल्यास प्रभागातील कचरा महानगरपालिकेत आणणार असल्याचे सांगितले. नगरसेवक प्रतिभा पवार यांनी मनपा आयुक्तांच्या वॉक विथ कमिशनरप्रमाणे वॉक विथ सभापती विथ अधिकारी असा उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे सांगत अधिकाºयांकडून नागरिकांची मनपाशी निगडित कुठलीही कामे होत नसल्याचा आरोप केला. नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी घंटागाडी ठेकेदाराकडून प्रशासनाने काम करून घेतले पाहिजे. प्रशासनाने लक्ष न दिल्यास शिवसेनेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर सिडकोतील घरांवर अतिक्रमणाच्या फुल्या महापालिकेने केल्या असल्या तरी सिडकोच्या घरांची परवानगी महानगर पालिकेने दिली नसल्याने त्यांना तो अधिकार नसल्याचे सांगितले. या प्रभाग सभेत केवळ मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात येऊन नगरसेवकांनी प्रभागातील समस्यांचा पाढा वाचला. पुढच्या सभेच्या सुरु वातीला या मागील विषयांवर चर्चा होईल आणि मगच नवीन काम सुरू होईल असा नवीन पायंडा सुरू केल्याचे सभापती हर्षा बडगुजर यांनी जाहीर केले. अधिकाºयांनी नगरसेवकांशी स्वत:हून संपर्कसाधून समस्या जाणून घेतल्या पाहिजे अशी सूचना केली.
नगरसेवक रत्नमाला राणे कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यावर कारवाई करावी असे सांगितले. तर नगरसेवक सुदाम डेमसे यांनी पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या अनेक अतिक्रमणांबाबत अधिकाºयांना सांगूनही ते लक्ष देत नसल्याचा आरोप केला. मुकेश शहाणे यांनी प्रभागातील नाला बंद केल्याचा तर श्यामकुमार साबळे यांनी प्रभागातील रस्त्यांवर असलेल्या ड्रेनेजवर डांबर टाकून ते बंदिस्त केल्याने निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. यावेळी नगरसेवक संगीता जाधव, भाग्यश्री ढोमसे, छाया देवांग, पुष्पा आव्हाड, कावेरी घुगे, कल्पना चुंभळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
नगरसेवक आक्रमक
सिडकोतील प्रभाग क्रमाक २४ मधील शिवाजी चौक भाजी मार्केट येथील अतिक्रमणामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्यावर लक्ष देत नसल्याने कल्पना पांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली व प्रभाग सभेतच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका त्यांनी घेतली. यावर सभापती हर्षा बडगुजर व विभागीय अधिकाºयांनी डॉ. सुनीता कुमावत येत्या आठ दिवसांत काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले यामुळे पांडे यांनी आंदोलनाची भूमिका मागे घेतली.