वाढीव वीजबीले भरणाऱ्यांना मिळाली सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:55 PM2020-10-06T23:55:00+5:302020-10-07T01:09:32+5:30
नाशिक: लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीजबीलांबाबत संशायाचे वातावरण असतांनाही ज्या ग्राहकांनी पुर्ण वीजबील भरले अशाच ग्राहकांना पुढील बीलात सवलत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक: लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना जून महिन्यात आलेल्या वीजबीलांबाबत संशायाचे वातावरण असतांनाही ज्या ग्राहकांनी पुर्ण वीजबील भरले अशाच ग्राहकांना पुढील बीलात सवलत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांना देण्यात आलेल्या दोन महिन्यांच्या वीजबीलाबाबत संपुर्ण राज्यात तक्रारींचा सूर उमटला होता. सर्वसामान्य नागरीकांपासून ते विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले होते. वाढीव रकमेची वीजबीले भरतांना सर्वसामान्यांना मोठा आर्थिक भार आल्याने ग्राहकांनी सवलतीची मागणी केली होती.
संपुर्ण राज्यात त्याप्रमाणेच नाशिाक जिल्'ातही वाढीव वीजबीले आल्याच्या तक्रारींचा पाऊस पडल्याने महावितरणने ग्राहकांना बील भरण्यासाठी युनिटनुसार सूट देण्याचे जाहिर केले होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल असे वाटले होते. प्रत्यक्षात ज्या ग्राहकांनी जून महिन्यात आलेले संपुर्ण वीजबील भरले त्यांनाच सूट देण्यात आल्याचे नाशिक परिमंडळाकडून सांगण्यात आले.
वाढीव बीलांच्या गोंधळानंतर अनेक ग्राहकांनी वीजबीले भरलीच नाही. त्यानंतर ग्राहकांना नियमित वीजबीले आली असून अनेकांची मोठी थकबाकी झालेल आहे. अशा ग्राहकांना आता कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे आत स्पष्ट झाले आहे.
न्याय मिळाला कुणाला?
ज्यांना जादा रकमेचे वीजबील आले परंतु त्यांना भरणे शक्य नव्हते अशांनीच याप्रकरणी आवाज उठविला.परंतु ज्यांना शक्य होते आणि आॅनलाईन व्यवहाराचा अनुभव आहे अशा ग्राहकांनी आॅनलाईन बीले भरली त्यांनाच अलगद लाभ मिळाला. थकबाकीदारांचे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला नाही एव्हढाच काय तो दिलासा