स्वेच्छेने ऑनलाइन घरपट्टी भरल्यास मिळणार सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 AM2021-05-01T04:13:34+5:302021-05-01T04:13:34+5:30
महापालिकेच्या वतीने २०१५ पासून घरपट्टीत सलवत योजना लागू करण्यात आली. यात महापालिकेच्या देयकांची वाट न बघता स्वेच्छेने ऑनलाइन इंडेक्स ...
महापालिकेच्या वतीने २०१५ पासून घरपट्टीत सलवत योजना लागू करण्यात आली. यात महापालिकेच्या देयकांची वाट न बघता स्वेच्छेने ऑनलाइन इंडेक्स नंबरव्दारे घरपट्टी भरल्यास एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के आणि जून महिन्यात दोन टक्के सवलत दिली जाते. याशिवाय, ऑनलाइन घरपट्टी भरल्यास एक टक्का सूट दिली जाते. तर, घरात सोलर वॉटर हीटर बसवले असल्यास पाच टक्के अतिरिक्त सूट दिली जाते. म्हणजेच सोलर हीटर असेल तर एप्रिल महिन्यात एकूण ११ टक्के सवलत मिळू शकते. तर, मे मध्ये नऊ, जून महिन्यात आठ टक्के सवलत मिळू शकते. मात्र, गेल्या वर्षी काेरोनाकाळात नागरिकांची अडचण तसेच निर्बंधांमुळे बाहेर पडता येत नसल्याने महापालिकेने घरपट्टी सवलतीच्या कालावधीत वाढ केली आहे. त्यानुसार, आता केवळ एप्रिलच नव्हे तर एप्रिल आणि मे महिन्याच्या अखेरपर्यंत घरपट्टीची देयके घरी येण्याची वाट न बघता करभरणा केल्यास पाच टक्के तसेच जून महिन्यात तीन आणि जुलै महिन्यात दोन टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
इन्फो...
काेरोनाचा मोठा फटका
गेल्या वर्षी महापालिकेने १६० कोटी रुपयांचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु, सवलती आणि अभय योजनेचा लाभ देऊनही प्रत्यक्षात ११२ कोटी रुपयांचीच वसुली झाली. आता पुन्हा कोरोनाचे संकट आल्याने नव्या आर्थिक वर्षातदेखील महापालिकेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.