दोन आठवड्यांत मिशन झीरोअंतर्गत शोधले ११५ बाधित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:23+5:302021-05-28T04:12:23+5:30

नाशिक : बाधित नागरिकांना लवकरात लवकर शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यासह आवश्यक सल्ला आणि उपचार उपलब्ध करून देण्याच्या मनपा ...

Discovered 115 affected under Mission Zero in two weeks! | दोन आठवड्यांत मिशन झीरोअंतर्गत शोधले ११५ बाधित !

दोन आठवड्यांत मिशन झीरोअंतर्गत शोधले ११५ बाधित !

Next

नाशिक : बाधित नागरिकांना लवकरात लवकर शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवण्यासह आवश्यक सल्ला आणि उपचार उपलब्ध करून देण्याच्या मनपा आणि भारतीय जैन संघटनेच्या उपक्रमांतर्गत गत दोन आठवड्यांमध्ये शंभराहून अधिक म्हणजे ११५ बाधितांना शोधून काढण्यात यश आले आहे. संबंधित सर्व बाधितांना त्वरित उपचारांसाठी दाखलदेखील करून घेण्यात आल्याने या बाधितांचा मुक्त वावर थांबून त्यांच्यापासून निरोगी नागरिकांना होऊ शकणाऱ्या बाधेची साखळी मोडून काढण्यात आली आहे.

नागरिकांच्या लसीकरणापूर्वी अँटिजन किंवा आरटीपीसीआर चाचणी होऊन त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना हुडकून त्यांना आवश्यक सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे व निगेटिव्ह व्यक्तींचेच लसीकरण व्हावे, या संकल्पनेद्वारे मिशन झीरो व मिशन लसीकरण हे अभियान नाशिक महानगरपालिका, भारतीय जैन संघटना, वॉटर ग्रेस कंपनी व नाशिक वॉरियर्स या संस्थांद्वारे पंचवटी, नाशिक रोड, नाशिक पश्चिम विभागात सुरू करण्यात आली आहे. पंचवटी विभागातील इंदिरा गांधी रुग्णालय, मायको दवाखाना, फुलेनगर, प्राथमिक आरोग्य केंद्र म्हसरूळ, मखमलाबाद, हिरावाडी, मार्केट यार्ड, दिंडोरी रोड, रेडक्रॉस, तपोवन, नांदूर- नाशिक रोड विभागातील खोले मळा, सिन्नर फाटा, दसक पंचक व नाशिक पश्चिम विभागातील रामवाडी-गंगापूर रोड येथे हे अभियान सुरू असून, दाेन आठवड्यांपूर्वी सुरू केेलेल्या या अभियानांतर्गत एकूण १,४५४ अँटिजन चाचण्या होऊन ०८ पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यात आले. त्यानुसार मिशन सुरू झाल्यापासून ८,४०० अँटिजन चाचण्या होऊन ११५ पॉझिटिव्ह रुग्णांना शोधण्यात यश आले, तर ८,८१५ निगेटिव्ह रुग्णांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. त्यायोगे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग होत असून, त्यातून पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होऊन गर्दीत होणारे संक्रमण रोखले जात आहे, तसेच उर्वरित नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला बळकटी मिळाली आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच मिशन झीरो व मिशन लसीकरण मोहिमेचे प्रकल्प संचालक नंदकिशोर साखला, दीपक चोपडा, वॉटर ग्रेसचे चेतन बोरा, नाशिक वॉरियर्सचे नरेंद्र गोलिया, गोपाल अटल, रामेश्वर मालानी, राजा जॉली, विनोद गणेरीवाल, ओम रुंगठा यांच्यासह अन्य मान्यवरांचे योगदान आहे.

इन्फो

सर्व सहा विभागांत लवकरच

लवकरच नाशिकच्या सहाही विभागांतील सर्व ३० लसीकरण केंद्रांजवळ मिशन झीरो हे अभियान सुरू होणार आहे. याठिकाणी लसीकरणाव्यतिरिक्तही नागरिक येऊन अँटिजन चाचणी करून घेऊ शकतात व त्यायोगे मनातील भीती दूर होण्यास मदतच होणार आहे. आवश्यकता भासल्यास सल्ला व उपचार घेऊ शकतात. त्यामुळे पुढील संक्रमण रोखण्यास हातभार लागेल.

Web Title: Discovered 115 affected under Mission Zero in two weeks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.