देवळाली बोर्डाकडून वाहनांना दंड आकारणी करताना भेदभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:21 AM2019-08-22T00:21:32+5:302019-08-22T00:21:51+5:30
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांना दंड आकारताना भेदभाव करण्यात येत असल्याची तक्रार असून, आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम अधिक असल्याने बाहेरगावाहून खरेदीसाठी येणारे ग्राहक देवळाली कॅम्पला येण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.
देवळाली कॅम्प : कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून रस्त्यालगत पार्किंग केलेल्या वाहनांना दंड आकारताना भेदभाव करण्यात येत असल्याची तक्रार असून, आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम अधिक असल्याने बाहेरगावाहून खरेदीसाठी येणारे ग्राहक देवळाली कॅम्पला येण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.
देवळाली कॅम्पमध्ये रस्त्यालगत असलेल्या फूटपाथवर अनेक ठिकाणी फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून पहिल्यांदा ते काढणे गरजेचे असताना त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. त्याचप्रमाणे वाहने एक दिवसाआड रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला समविषम तारखेला विशेष अशी रंगाची पट्टी मारून त्याबाहेर लावण्यात येणाºया वाहनांवर कारवाई करणे अपेक्षित असताना तसे होत नाही.
कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आकारण्यात येणारी दंडात्मक रक्कम कमी करावी तसेच वाहने उभी करतानाच वाहनधारकांना माहिती समजेल असे फलक लावावेत, अशी मागणी रतन चावला आणि नागरिकांनी यांनी केली आहे.
एकच नियम लावण्याची मागणी
दोन दिवसांपूर्वी दुपारी बारा वाजता हौसनरोडवर विजयनगर येथील रहिवासी एका रुग्णाला घेऊन देवळाली कॅम्प येथे आला होता. आपली चारचाकी इतर चारचाकीच्या बाजूला उभी करून ते समोरील दुकानात गेले. त्यावेळी त्यांची चारचाकी नाशिकची पासिंग नसल्यामुळे तिच्यावर दंडात्मक कारवाई तसेच व्हील लॉक करण्यात आले. यासंदर्भात विचारणा केली असता, वाहन स्थानिक नसल्याचे कारण देण्यात आले.
विशेष म्हणजे याच ठिकाणी देवळाली कॅम्पमधील राजकीय पुढाºयाच्या समर्थकाची गाडी उभी होती त्यावर मात्र कारवाई करण्यात आली नाही. यामुळे दंड आकारतानाही देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून भेदभाव होत असल्याचा अनुभव अनेक दुचाकी, चारचाकी वाहनधारकांना येत आहे. प्रशासनाने नो पार्किंगबाबत निश्चित धोरण आखताना सर्वांना एकच नियम लावून दंड करावा, अशी मागणी देवळाली कॅम्प परिसरातील नागरिक करू लागले आहेत.