केळझर धरणाच्या चारी दुरुस्तीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:59 PM2018-11-02T23:59:36+5:302018-11-03T00:00:58+5:30

निकेवल : बागलाण तालुक्यातील चौंधाणे येथे केळझर (गोपाळसागर) धरण कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सटाणा बागायत संघाचे अध्यक्ष माधव काशीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वप्रथम केळझर धरणाचे प्रवर्तक कै. गोपाळराव तानाजी मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Discuss about the repair of the Kelzer dam | केळझर धरणाच्या चारी दुरुस्तीवर चर्चा

केळझर धरणाच्या चारी दुरुस्तीवर चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देनूतनीकरणाची मागणी : चौंधाणे येथे कृती समितीची बैठक

निकेवल : बागलाण तालुक्यातील चौंधाणे येथे केळझर (गोपाळसागर) धरण कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सटाणा बागायत संघाचे अध्यक्ष माधव काशीराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या बैठकीत सर्वप्रथम केळझर धरणाचे प्रवर्तक कै. गोपाळराव तानाजी मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
बैठकीत केळझर धरणाच्या चारी क्रमांक १ ते ८ सुधारण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चारीचे नूतनीकरण करण्यात यावे, तसेच याबाबत पाठपुरावा करण्यात यावा, असे ठरविण्यात आले. चालू वर्षी दुष्काळी स्थिती असल्याने केळझर धरणामधून शेतीसाठी पाणी सोडण्यात यावे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्याकडील थकबाकी भरून नवीन अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले.
हत्ती, कान्हेरी, आरम नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाºयांची दुरुस्ती करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांकडे व मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी चौंधाणेचे सरपंच राकेश मोरे, साहेबराव पवार, महेंद्र खैरनार, रमेश वाघ, अशोक सोनवणे आदींनी चर्चत भाग घेतला.
केळझरचे प्रवर्तक गोपाळराव मोरे यांचा पुतळा केळझर धरणावर उभारण्यात यावा, सटाणापासून केळझर धरणापर्यंत गोपाळसागर या नावाचे दिशादर्शक फलक लावण्याचे ठरविण्यात आले. यावेळी संजय शिवाजी सोनवणे, उपाध्यक्ष महादू सावकार, कैलास बोरसे आदी उपस्थित होते. सरपंच राकेश मोरे यांनी आभार मानले.

Web Title: Discuss about the repair of the Kelzer dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक