‘संगीत देवबाभळी’वर रंगली चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:16 AM2018-10-15T00:16:49+5:302018-10-15T00:17:10+5:30
मागील काही महिन्यांपासून गाजणाऱ्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा प्रवास व विविध पैलूंवर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकाश टाकण्यात आला.
नाशिक : मागील काही महिन्यांपासून गाजणाऱ्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा प्रवास व विविध पैलूंवर जिल्हा साहित्यिक मेळाव्यात प्रकाश टाकण्यात आला.
नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी, लेखक प्राजक्त देशमुख, संगीतकार आनंद ओक व नेपथ्यकार प्रफुल्ल दीक्षित यांच्याशी दत्ता पाटील यांनी संवाद साधला. यावेळी देशमुख म्हणाले की, घरात वारकरी परंपरा असल्याने त्या वातावरणात लहानपणापासून संस्कार झाले. आजोबा पहाटे चारला उठून हरिपाठ म्हणत असायचे. तेव्हा त्यांनी लावलेल्या अगरबत्तीचा टिंब हाच या नाटकाचा स्त्रोत ठरला असल्याचे कांबळी म्हणाले. तसेच मराठी नवकथाकार दिवंगत अरविंद गोखले यांच्या कथेचे किरण सोनार यांनी सादरीकरण केले. यावेळी सावाना पदाधिकारी उपस्थित होते.