कामगारांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांच्याशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:15 AM2021-09-23T04:15:56+5:302021-09-23T04:15:56+5:30

सिन्नर : येथील केला ग्रुपच्या कारखान्यांतील कामगारांच्या प्रश्नांवर राज्याचे कामगारमंत्री बच्चू कडू यांच्याशी प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी चर्चा ...

Discussion with Bachchu Kadu on workers' issues | कामगारांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांच्याशी चर्चा

कामगारांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांच्याशी चर्चा

Next

सिन्नर : येथील केला ग्रुपच्या कारखान्यांतील कामगारांच्या प्रश्नांवर राज्याचे कामगारमंत्री बच्चू कडू यांच्याशी प्रहारचे जिल्हाध्यक्ष शरद शिंदे यांनी चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढतो, असे आश्वासन बच्चू कडू यांनी दिले. सिन्नर तालुक्यात केला ग्रुपचे खूप मोठे योगदान असून, या उद्योगाचा देशभरात नावलौकिक आहे. या कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा आहे. केला उद्योग समूहाच्या भरभराटीत कामगारांचे योगदान मोठे आहे. अशा कामगारांच्या बदल्या करणे किंवा कामावर काढणे योग्य नाही, त्यांना न्याय द्यावा, कंपनी व कामगार यांनी एकमेकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी शिंदे यांनी केली. प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायधनी, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर शेलार, सिन्नर तालुकाध्यक्ष कैलास दातीर, कामगार संघटना अध्यक्ष कपिल कोठूरकर, शेतकरी संघटना अध्यक्ष चंद्रकांत डावरे, उपाध्यक्ष मधुकर निकम, सचिव खंडेराव सांगळे आदींनी कडू यांच्याकडे तालुक्यातील औद्योगिक परिस्थिती मांडली.

Web Title: Discussion with Bachchu Kadu on workers' issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.