राधाकृष्ण गमे यांच्या बदलीच्या घाईमागील संपेना चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 02:03 AM2020-09-03T02:03:54+5:302020-09-03T02:04:27+5:30
अखेर महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. असे असले तरी ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू करण्यास धाडले आणि चार दिवस गमे यांना तिष्ठत ठेवण्यात आले, त्यातून काय साध्य झाले, अशी चर्चा आता होत आहे.
नाशिक : अखेर महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सूत्रेही स्वीकारली. असे असले तरी ज्या घाईने आणि मावळते विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या सेवानिवृत्तीची वाट न बघता कैलास जाधव यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू करण्यास धाडले आणि चार दिवस गमे यांना तिष्ठत ठेवण्यात आले, त्यातून काय साध्य झाले, अशी चर्चा आता होत आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्या आता प्रशासकीय बाब राहिलेली नाही. त्यातील राजकीय हस्तक्षेपांमुळे ती मुळातच सोईचा भाग आहे. कोणत्या राजकीय नेत्याला कधी कोणता अधिकारी जवळचा वाटेल आणि त्याची वर्णी कुठे लागेल, हे त्या त्या वेळीच ठरत असते. सध्या राज्यात कोरोना काळ संपलेला नसतानाही ज्या वेगाने शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत ते बघता या बदल्यांमागील गणिते वेगळीच असल्याचीदेखील चर्चा सुरू असते.
राधाकृष्ण गमे यांच्या बाबतीत असेच काही घडले आहे. तुकाराम मुंढे यांच्या वादग्रस्त बदलीनंतर त्यांची नाशिक महापालिकेत १५ डिसेंबर २०१८ रोजी नियुक्ती झाली आणि त्यांनी सारे स्थिरस्थावर केले. अगदी स्वच्छ सर्वेक्षण आणि स्मार्ट सिटीत मुंबई, पुण्याला मागे टाकून जी चमकदार कामगिरी केली, त्यातून नाशिकमध्ये अगदी कोरोना संकटकाळातदेखील राज्यात नाशिकची छाप पडली. कोरोनाचे तर महासंकट नाशिकला आव्हान ठरत असताना जोखीम पत्करून अधिकाधिक चाचण्यांनी बाधितांच्या संख्येत वाढ होईल हे ठाऊक असतानादेखील गमे यांनी काम वेगाने पुढे नेले. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि २६ आॅगस्ट रोजी कैलास जाधव यांची नाशिक महापालिकेत नियुक्ती करण्यात आली. गमे यांना कुठेही नियुक्ती देण्यात आली नसली तरी त्यांना नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यामुळे त्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली.
नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने हे नियत वयोमानाने तसे ३१ आॅगस्ट रोजी निवृत्त होणारच होते, तर मग गमे यांची त्या आधी चार दिवस अगोदर घाईघाईने बदली करण्याचे कारण काय? गमे यांच्या कारकिर्दीच्या चार दिवसात असा कोणता उलटफेर होणार होता की, जाधव यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी दुसºया दिवशी तडक नाशिकमध्ये कार्यभारदेखील स्वीकारला. गमे यांना चार दिवस प्रतीक्षेत ठेवून मग नाशिकलाच नियुक्ती देण्यात आली. परंतु चार दिवस अगोदर बदली करण्यामुळे संंबंधित उच्चपदस्थांच्या अंतस्थ हेतूची यानिमित्ताने चर्चा होत आहे.
मनपा आयुक्त आणि कार्यकाळ
नाशिक महापालिकेत तसे तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचे भाग्य अत्यंत अपवादानेच अधिकाºयांना मिळाले आहे. चांगले काम केल्यानंतरदेखील पूर्ण काळ मिळतोच असे नाही. सनदी अधिकाºयांच्या बदल्यांमागे फोर्स वगळेच असतात. आणि कित्येकदा तर अधिकाºयांचे आपसातील संघर्षही कारणीभूत ठरतात. गमे यांच्या बदलीमागे राजकीय हस्तक्षेपाबरोबरच प्रशासकीय संघर्षदेखील चर्चेत आहे.