मनमाडच्या ज्येष्ठ नागरिक समितीची नागरीप्रश्नी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:50 PM2021-06-12T23:50:26+5:302021-06-13T00:13:51+5:30
मनमाड : येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
मनमाड : येथील ज्येष्ठ नागरिक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंडे यांची भेट घेऊन शहरातील विविध प्रश्नांबाबत चर्चा केली.
कोरोनामुक्तीसाठी गावातील प्रमुख नागरिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रमुख, व्यापारीबांधव आणि प्रशासनातील अधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेऊन सर्वांना मान्य होईल अशी एक नियमावली तयार करावी व त्याची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच स्वच्छता अभियानांतर्गत सर्व जलकुंभाची स्वच्छता करण्यात यावी, वाघदर्डी धरणाच्या पीचिंगची दुरुस्ती करून भविष्यातील धोका टाळावा, शहरातील साफसफाईबाबत अधिक लक्ष देण्यात यावे, आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
मुख्याधिकारी यांनी यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, सचिव एस. एम. भाले, कार्याध्यक्ष नरेंद्र कांबळे, सदस्य आर. बी. ढेंगळे, गणपत पगारे, रामभाऊ गवळी, डॉ. एम. डी. बहादुरे, रत्नाकर कांबळे, वसंत महाले, एस. डी. देवकर, दिलीप आव्हाड आदी उपस्थित होते.