सोशल मीडियावर रंगली रुग्णवाहिकेच्या श्रेयाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:13 AM2021-05-17T04:13:25+5:302021-05-17T04:13:25+5:30

चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयाला बऱ्याच दिवसांपासून रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. अखेर रुग्णवाहिका मिळाली खरी मात्र ...

Discussion of the credit of Rangli Ambulance on social media | सोशल मीडियावर रंगली रुग्णवाहिकेच्या श्रेयाची चर्चा

सोशल मीडियावर रंगली रुग्णवाहिकेच्या श्रेयाची चर्चा

Next

चांदवड : येथील उपजिल्हा रुग्णालयाला बऱ्याच दिवसांपासून रुग्णवाहिका नसल्याने रुग्णांचे हाल होत होते. अखेर रुग्णवाहिका मिळाली खरी मात्र दिवसभर या रुग्णवहिकेच्या श्रेयवादावरुन सोशल मीडियावर महाविकास आघाडी सरकारचे पाठीराखे व विरोधी भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या समर्थकांत चांगलीच रंगतदार चर्चा रंगल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, श्रेय कुणीही घ्या मात्र या कोरोना काळात एकदाची चांदवड उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका मिळाली, हे महत्त्वाचे असल्याची टिप्पणीही जाणकारांनी केली.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राज्यात एकूण ४४२ रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्या. त्यापैकी जिल्ह्याला काल सहा रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. त्याचे वितरण मालेगाव येथे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडले. त्यात मालेगाव शहरातील महिला व बालरुग्णालय, सामान्य रुग्णालय यासह कळवण, चांदवड, मनमाड, येवला येथे प्रत्येकी एक अशा सहा रुग्णवाहिकांची पूर्तता करण्यात आली. मालेगाव येथे सहाही रुग्णवाहिकांचे फीत कापून भुसे यांच्या हस्ते वाटप झाले. दरम्यान, चांदवड येथे या रुग्णवाहिकेचे आगमन होताच भाजपचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, माजी सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. या लोकार्पणाचे वृत्त सोशल मीडियावर झळकताच पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी ही रुग्णवहिका त्यांच्यामुळे मिळाली तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषिमंत्री भुसे यांच्यामुळे ही रुग्णवाहिका मिळाली तर आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या समर्थकांनी आरोग्य संचालकांना पाठविलेल्या पत्राची प्रतच सोशल मीडियावर दाखवली. ही आपापसातील श्रेयवादाची लढाई सुरु असताना, श्रेय कुणीही घ्या मात्र चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयाला अखेर रुग्णवाहिका मिळाली व अपघाताग्रस्तांना त्यामुळे तातडीने निश्चितच मदत होईल, याचे समाधान नागरिकांमधून व्यक्त होत होते.

Web Title: Discussion of the credit of Rangli Ambulance on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.