गिरीश महाजनांशी चर्चा निष्फळ, शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणारच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 01:13 AM2019-02-21T01:13:20+5:302019-02-21T01:13:50+5:30
किसान सभेने मांडलेले सगळे मागणे सरकार विचारात घेणार असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले दरम्यान त्यांनी थांबवावा अशी विनंती केली मात्र किसान सभेचे शिष्टमंडळाने त्यांची विनंती मान्य केली नाही
नाशिक - जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाने बुधवारी रात्री तब्बल दीड तास चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली आहे. कारण या चर्चेतून लॉंग मार्च रोखण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारची तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाँग मार्च निघणारच असे दिसून येते.
किसान सभेने मांडलेले सगळे मागणे सरकार विचारात घेणार असे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले दरम्यान त्यांनी थांबवावा अशी विनंती केली मात्र किसान सभेचे शिष्टमंडळाने त्यांची विनंती मान्य केली नाही जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लेखी हमीपत्र देणार नाही तोपर्यंत लॉंग मार्च सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे नाशिकच्या गोदाकाठावरून घोंगावणारे लाल वादळ मुंबईच्या अरबी समुद्रात जाऊन धडकणार आहे हे निश्चित झाला किसान सभेच्या शिष्टमंडळाने नामदार महाजन यांच्याशी प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा केली तसेच या मागण्यांवरील उपाय योजना सरकारला कशाप्रकारे शक्य आहे हे पटवून दिले त्यामुळे जर इच्छाशक्ती दाखवली तर सरकार तातडीने निर्णय घेऊ शकते.