चर्चा, बैठका आणि प्रचारही

By admin | Published: February 14, 2017 01:11 AM2017-02-14T01:11:54+5:302017-02-14T01:12:08+5:30

धावपळीत उमेदवारांपर्यंत पोहचण्याची धडपड

Discussion, meetings and publicity | चर्चा, बैठका आणि प्रचारही

चर्चा, बैठका आणि प्रचारही

Next

नाशिक : सकाळी मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर महात्मानगर मैदानावर फेरफटका आणि ज्येष्ठांच्या चर्चेने राजकीय प्रचाराला सुरुवात होते. आलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतानाच एकेका उमेदवाराचे फोन सुरू होतात आणि त्यांच्या प्रचारासाठी येण्याची वेळ निश्चित करून सुरू होतो राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा दिवसभराचा दौरा. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचार सुरू असतांनाच राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांचा दिनक्रम कसा असतो याबाबत लोकमतने ‘एक दिवस शहराध्यक्षांसमवेत’ उपक्रम राबविला आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या समवेत दौरा करण्यात आला.
शहराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे रंजन ठाकरे यांना सकाळी पहिला फोन आला तो परिसरात पाणीपुरवठा झाला नाही याचा. फोनवरच त्यांनी संबंधित नागरिकाचे निरसन केले. पाइपलाइन दुरुस्तीनंतर सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे त्यांनी इतर नागरिकांनाही फोनवरूनच आश्वस्त केले. गाडी सुरू झाली आणि कामगारनगर गाठले. कामगारनगरमधील नागरिकांच्या चर्चेने त्यांचा दिवस सुरू झाला. चर्चा अर्थात प्रचारयंत्रणेचीच होती. यादरम्यानही उमेदवारांचे फोन सुरूच होते.
प्रभाग आठमधील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उमेदवार प्रतीक्षेत असल्याने गाडीने वेग घेतला आणि उद्घाटनस्थळी पोहचल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले.  दहा ते पंधरा मिनिटांच्या या धावपळीत उद्घाटन आणि प्रचाराचे सोपस्कार पूर्ण करीत ठाकरे यांनी काही मिनिटांत आनंदवलीहून नांदूर नाका गाठला. नांदूरगावात उमेदवारांसमवेत प्रचारफेरीत सहभाग घेऊन त्यांनी एका मंदिरात नारळही फोडला. मग एका छोटेखानी हॉटेलात सुमारे अर्धा तास कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

Web Title: Discussion, meetings and publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.