नैराश्यमुक्तीसाठी चर्चा आवश्यक : चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:49 AM2019-11-24T00:49:57+5:302019-11-24T00:50:21+5:30

काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.

 Discussion needed for depression relief: Chavan | नैराश्यमुक्तीसाठी चर्चा आवश्यक : चव्हाण

नैराश्यमुक्तीसाठी चर्चा आवश्यक : चव्हाण

Next

नाशिक : काही वेळा एखादे आजारपण झाले की आजारपणानंतर आलेल्या शारीरिक दुर्बलतेतून मानसिक स्वास्थ्यही बिघडते. स्वत:च्या शक्तीवरचा, क्षमतेवरचा विश्वास उडतो. भीती वाटते, वेदनांची, मृत्यूची भीती आणि मनातल्या मनात कुढणे, जगाशी संपर्क नकोसा वाटणे, कोणाशी संवाद साधणे नकोसे होणे, व्यायामाबाबत व योग्य आहाराबाबत उदासीनता, स्वत:च्या परावलंबी असण्याबद्दलची खंत, त्रास, चिंता आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याबद्दल निरुत्साह यासाठी नैराश्य आलेल्या व्यक्तीने आपल्या जवळच्या व्यक्त्ािंसोबत चर्चा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉ. धनंजय चव्हाण यांनी केले.
नाशिक सायक्रियास्ट्रिक सोसायटीतर्फे शनिवारी (दि.२३) कुसुमाग्रज स्मारकात ‘डिप्रेशन : समज व गैरसमज’ याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी नैराश्य येण्याची कारणे व त्याविषयी करण्यात येणाऱ्या उपायांविषयी मार्गदर्शन केले. नेहमी ज्या गोष्टी करतो त्याविषयी रुची नसणे, मनात आत्महत्येचे विचार येणे यामुळे नैराश्य अजूनच बळावतो. तसेच नैराश्य आलेल्या व्यक्ंितनी आपल्या जवळच्या व्यक्तिंच्या सहवासात राहणे आवश्यक आहे. लहानसहान घटना मनाला लावून घेणे, बदलत्या काळासोबत स्वत:ला बदलण्याची तयारी नसणे व त्यातून आलेले वैफल्य, रिकाम्या वेळाचा वापर कसा करायचा हे न कळल्यामुळे मनाचा हट्टीपणा या आणि अशा अनेक गोष्टी नैराश्याची भावना घट्ट करत जाऊ शकतात. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी अशा व्यक्तीने बोलून मनमोकळे करणे आवश्यक आहे.
तसेच त्या व्यक्ंितच्या जवळच्या माणसांनीही त्याला आधार देऊन त्याला समजून घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी आयोजक गिरीश पगारे, राजीव ठाकरे, अभिजीत पाटील, शिरीष सहस्त्रबुद्धे, अशोक पवार, पा. भा. करंजकर आदी उपस्थित होते.
ही आहेत लक्षणे
एखाद्याला नैराश्य येण्याचे प्रमुख लक्षणांमध्ये त्या व्यक्तीला थकवा येणे, निरुत्साह वाटणे, भूक कमी किंवा जास्त लागणे, उदास वाटणे, चिडचिड होणे, झोप कमी किंवा जास्त येणे, आत्मविश्वास गमावणे, चुका करण्याची भीती वाटणे, कामात लक्ष न लागणे, निर्णयक्षमता गमावणे तसेच प्रमुख लक्षणे म्हणजे मनात आत्महत्येचा विचार येणे असे लक्षणे नैराश्य आलेल्या व्यक्तीला येत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

Web Title:  Discussion needed for depression relief: Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.