‘क्रॉम्प्टन’ देणी प्रश्नी निमाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 11:04 PM2019-11-09T23:04:32+5:302019-11-10T00:52:44+5:30
क्र ॉम्प्टन गिव्हज कंपनीकडे असलेली देणी वेंडर्सना मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा पदाधिकाऱ्यांची अंबड येथील कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. दोन दिवसंत संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन कंपनीचे उपाध्यक्ष मुकुल श्रीवास्तव यांनी निमा शिष्टमंडळाला दिले.
सातपूर : क्र ॉम्प्टन गिव्हज कंपनीकडे असलेली देणी वेंडर्सना मिळवून देण्याच्या दृष्टीने निमा पदाधिकाऱ्यांची अंबड येथील कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. दोन दिवसंत संचालक मंडळाची बैठक होणार असून, त्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित करण्याचे आश्वासन कंपनीचे उपाध्यक्ष मुकुल श्रीवास्तव यांनी निमा शिष्टमंडळाला दिले.
अंबड औद्योगिक वसाहतीतील क्रॉम्प्टन ग्रिव्हज पॉवर सोल्युशन्स कंपनीकडे ११० वेंडर्स (लघुउद्योजकांचे) जवळपास २२५ कोटी रुपये गेल्या तीन महिन्यांपासून अडकून आहेत. या लघुउद्योजकांनी निमाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, खजिनदार कैलास आहेर, माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य महेश दाबक आदींसह वेंडर्सनी कंपनीचे उपाध्यक्ष श्रीवास्तव यांची भेट घेतली व सविस्तर चर्चा केली. जवळपास दीड तास चाललेल्या या चर्चेत श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीस नाशिक स्तरावरील घटक कारणीभूत नसून कंपनीच्या वरिष्ठ स्तरावरील व्यवस्थापनाने घेतलेले निर्णय जबाबदार आहेत. जूनपर्यंत परिस्थिती फारशी गंभीर वाटली नाही, परंतु त्यानंतर तिची भीषणता जाणवू लागली. उत्पादन १० टक्क्यांवर आणावे लागले. परिस्थिती पूर्ववत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असून, तीन महिन्यांचा कालावधी लागेल. अडचणीत आलेले वेंडर्स व अवलंबून लघुउद्योजकांनी समाधान पोर्टल, सुकरता परिषद व अन्य रीतसर मार्गाने आपल्या तक्रारी व प्रश्न मांडू शकतात. त्यात गैर काहीच नसून तो त्यांचा हक्क आहे. त्यांच्याबाबत कंपनी आम्ही अथवा कंपनी कोणताही आकस ठेवणार नाही. दोन दिवसांत संचालक मंडळाची बैठक पार पडणार असून, त्यात हा विषय मांडण्यात प्रयत्न करू, असे आश्वासन निमा शिष्टमंडळाला दिले. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी नाशिकला येतील त्यावेळी निमा पदाधिकाºयांसोबत बैठक आयोजित घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.