बारा बलुतेदार महासंघाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:33+5:302021-07-18T04:11:33+5:30
पंचवटी पेठरोड येथील कुमावतनगरात बारा बलुतेदार महासंघाच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बलुतेदार नेते कल्याणराव ...
पंचवटी पेठरोड येथील कुमावतनगरात बारा बलुतेदार महासंघाच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बलुतेदार नेते कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाने प्रथम संघटना मजबूत करणे, तालुका, शहर, जिल्हा याप्रमाणे १२ बलुतेदार, १८ अलुतेदारांना सामावून घेत संघटना मजबूत झाली की, शासनदरबारी बलुतेदारांचा दबाव गट निर्माण करून ओबीसी समाजांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे मेटकर यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासित केले. याप्रसंगी कुमावत समाजाचे प्रदेशाध्यक्ष साहेबराव कुमावत यांनी मनोगत व्यक्त केले. देवीदास परदेशी, निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव कारवाल, जिल्हा सचिव कैलास परदेशी, झोन अध्यक्ष भाऊसाहेब परदेशी, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब माचीवाल, राकेश कारवाल, अमोल कुमावत, रूपेश कुमावत, विभागीय अध्यक्ष कैलास कुमावत, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष संदीप खैरनार, सचिव संजय खैरनार यांच्यासह विविध बारा बलुतेदार समाजाचे समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो- १७ बारा बलुतेदार
बारा बलुतेदार महासंघाच्या बैठकीत बोलताना विजय पवार. समवेत मुुकुंदराव मेटकर व पदाधिकारी.
170721\17nsk_25_17072021_13.jpg
फोटो- १७ बारा बलुतेदार बारा बलुतेदार महासंघाच्या बैठकीत बोलताना विजय पवार. समवेत मुुकुंदराव मेटकर व पदाधिकारी.