वैचारिक मतभेदामुळे आपल्या संस्कृतीचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:13 AM2018-08-21T01:13:45+5:302018-08-21T01:14:09+5:30
समाजातील वाढलेल्या भेदभावामुळे देशाची प्रगती होत नसून आपापसातील वैचारिक मतभेदांमुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो असल्याचे, तसेच तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे,
गंगापूर : समाजातील वाढलेल्या भेदभावामुळे देशाची प्रगती होत नसून आपापसातील वैचारिक मतभेदांमुळे आपण आपली संस्कृती विसरत चाललो असल्याचे, तसेच तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे, असे प्रतिपादन वांबोरी महानुभाव आश्रमाचे आचार्य ऋषीराजबाबा शास्त्री यांनी केले. गिरणारे येथे एकमुखी दत्तमंदिरात सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शास्त्रीजी म्हणाले, नाशिक ही तीर्थांची भूमी असून, या भूमीत भगवान चक्र धर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन अशी अनेक तीर्थक्षेत्रे आहे. सद्यस्थितीतील अशांतता बघता तरुणांनी आध्यात्मिक मार्ग व सामाजिक सेवा कार्यात झोकून दिले पाहिजे, असे यांनी सांगितले. महंत चक्रपाणीबाबा यांनी आचार्य शास्त्री यांचे स्वागत केले. पूजा-अर्चा, देवदर्शनविधी यावेळी पार पडला. यावेळी सात्विक मुनी, दयाळ मुनी, श्रीधरानंद सुकेनेकर, श्यामसुंदर कोठी, विश्वनाथ कोठी, दत्तू थेटे, नारायण उगले, राजू लभडे, चंद्रकांत खोसकर, योगेश तिदमे, अमोल थेटे, कृष्णा गायकर, दीपक थेटे, गणपत नवले, योगेश थेटे, सुनील थेटे, भीमा करवंदे यांसह भाविक भक्त यावेळी उपस्थित होते.