जीवनावश्यक पुरवठ्यासाठी पोलीस विभागाशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:12 AM2020-12-08T04:12:58+5:302020-12-08T04:12:58+5:30
विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी ...
विरोधात दिल्लीत देशभरातील शेतकरी एकवटले आहेत. नवा कृषी कायदा हा शेतकरी विरोधी असून, भांडवलदारांच्या हिताचा असल्याचा आरोप करीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. हा कायदा पूर्णपणे बदलण्यात यावा या मागणीसाठी देशभर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलने सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक संघटनांनी तसेच शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्याचे अगोदरच जाहीर केले आहे.
बंदच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात येणार्या आणि जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पोलीस विभागाशी चर्चा केली आहे. आले ते जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व परिस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचेदेखील सांगण्यात आले.
दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी यासंदर्भात शहर व ग्रामीण पोलिसांशी चर्चा केली असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत
----kot---,
पोलीस विभागाशी चर्चा केलेली आहे. त्यांनी, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील व प्रमुख रस्ते कार्यरत राहतील याबद्दलचे पूर्वनियोजन केलेले आहे.
-सूरज मांढरे, जिल्हाधिकारी