कळवण उपजिल्हा रुग्णालयाच्या आढावा बैठकीत समस्यावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 10:09 PM2019-12-29T22:09:48+5:302019-12-29T22:10:36+5:30
आमदार नितीन पवार यांच्या समवेत कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
कळवण : आमदार नितीन पवार यांच्या समवेत कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रवींद्र देवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, कळवण शिक्षण संस्थेचे संचालक भूषण पगार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
आमदार पवार यांनी कळवण उपजिल्हा रु ग्णालयाला भेट घेऊन वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम असल्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उपजिल्हा रुग्णालय जनतेसाठी आधार असल्यामुळे मंजूर असलेली सर्व पदे, प्रशासकीय इमारतीसह निर्माण झालेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न राहील, रुग्णसेवेबाबत तक्रारी येणार नाही यादृष्टीने कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन आमदार पवार यांनी यावेळी केले. उपजिल्हा रु ग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन आमदार पवार यांनी प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांनी आमदार पवार व समवेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी स्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश लाड, भीषक डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. पंकज जाधव, परिसेविका सुलभा भोये, कुणाल कोठावदे, योगेश भोये, कार्यालयीन अधीक्षक संदीप सूर्यवंशी, औषधनिर्माण अधिकारी रवींद्र शिवदे, वैभव काकुळते, टेलेमेडिसिन सेवा व्यवस्थापक जयदीप भदाणे, क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी महेश बागुल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी राजेंद्र येवला आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रकाश आहेर यांनी केले.
विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा
नितीन पवार यांनी उपजिल्हा रु ग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कामकाज व सद्यस्थितीतील व प्रलंबित प्रश्न, नियोजन, मागण्या, रिक्त पदे यांचा आढावा बैठकीत घेतला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे यांनी शुश्रूषा, औषध, टेलेमेडिसिन, शस्रक्रि या विभाग यांची माहिती देत रिक्त पदे भरण्याची मागणी केली.