रेल्वेस्थानकातील समस्यांवर चर्चा

By admin | Published: February 25, 2016 10:28 PM2016-02-25T22:28:17+5:302016-02-25T22:41:25+5:30

रेल्वेस्थानकातील समस्यांवर चर्चा

Discussion on the problems in the railway station | रेल्वेस्थानकातील समस्यांवर चर्चा

रेल्वेस्थानकातील समस्यांवर चर्चा

Next

मनमाड : भुसावळ मंडल सल्लागार समितीची बैठकमनमाड : भुसावळ मंडळ उपयोगकर्ता सल्लागार समितीची १५६वी बैठक विभागीय रेल्वे प्रबंधक सुधीरकुमारजी गुप्ता यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. मनमाड जंक्शन रेल्वेस्थानकाच्या विविध समस्यांवर या वेळी चर्चा करण्यात आली.
मनमाड, लासगाव, निफाड या रेल्वेस्थानकांवर गीतांजली एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा तसेच नाशिकहून सकाळी मनमाड, नांदगाव व पुढे भुसावळपर्यंत व परतीसाठी प्रवाशी व चाकरमान्यांसाठी उपयुक्त अशी विशेष गाडी सुरू करावी. मनमाड रेल्वेस्थानकावर पार्किंगची सुविधा तसेच प्रवाशांसाठी फलाटावर मेडिकल सुविधा मिळावी. स्थानकावर सरकते जिने लावण्यात यावेत त्याच प्रमाणे लासलगाव रेल्वेस्थानकावरील ओव्हरब्रिजचे काम संथ गतीने होत असल्याची तक्रार मंडल उपयोगकर्ता सल्लागार समिती सदस्य कांतिलाल लुणावत यांनी केली. यावर सकारात्मक चर्चा होऊन समस्या सोडवण्याची ग्वाही देण्यात आली. या वेळी रेल्वे अधिकारी दहाड, नरपत सिंग, विजय कदम, पवन पाटील आदि उपस्थित होते. मनमाड रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना तिकिटासाठी तीन जनसाधारन तिकीट बुकिंग सेवकांची नेमणूक करण्यात आली असून, गर्दीच्या वेळी प्रवाशानी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Discussion on the problems in the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.