समृद्धी मूल्यांकन बैठकीत तिढा सोडविण्यावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 01:30 AM2019-05-28T01:30:43+5:302019-05-28T01:31:42+5:30

समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.

 Discussion on redressing the richness in the assessment meeting | समृद्धी मूल्यांकन बैठकीत तिढा सोडविण्यावर चर्चा

समृद्धी मूल्यांकन बैठकीत तिढा सोडविण्यावर चर्चा

Next

नाशिक : समृद्धी महामार्गाच्या जमीन हस्तांतरणाची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सकारात्मक मार्ग काढण्याबरोबरच शेतकऱ्यांशी संवाद साधून जमीन हस्तांतरणातील तिढा सोडविला जाणार असल्याची चर्चा समृद्धी मूल्यांकनाच्या बैठकीत करण्यात आली.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारी समृद्धी महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांच्या ‘टास्क फोर्सची‘ची बैठक बोलविली होती. यावेळी त्यांनी महामार्ग कामाची प्रगती व अडथळे याचा आढावा घेण्यात आला. समृद्धी महामार्गातील अडचणी समजावून घेण्याबरोबरच कोणत्या मुद्द्यावर शेतकºयांशी संवाद साधून यातून मार्ग काढता येऊ शकेल याबाबत अधिकाºयांशी चर्चा केली. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढला जाईलच शिवाय यापूर्वी हस्तांतरण करण्यात आलेल्या, परंतु अद्यापही शेतकºयांच्या ताब्यातच असलेल्या जमिनी मिळविण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे.
सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील मºहळ बुद्रूक, खंबाळे, पिंगळगाव डुकरा, डुसंगवाडी येथील जमिनीच्या भूसंपादनाचा मुद्दा अद्याप प्रलंबित आहे. सदर जमिनी पाटबंधारे विभागाने यापूर्वीच संपादित केलेल्या आहेत, त्यांचा मोबदला शेतकºयांना देण्यात आलेला आहे, मात्र त्यांची मालकी अद्यापही शेतकºयांकडेच आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी प्रारंभी शेतकºयांना नोटिसादेखील देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
हस्तांतरित जमिनी देण्याबाबत होणारा विरोध कमी करण्यासाठी शेतकºयांशीदेखील चर्चा केली जाणार आहे. शेतकºयांकडून होणाºया विरोधामुळे काही ठिकाणी समृद्धी महामार्गाचे काम खोळंबले आहे, मात्र आता हे काम मार्गी लावण्यासाठी प्राधान्य दिले
जाईल यासाठीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी अधिकाºयांना दिल्या आहेत. बैठकीत महामार्गाच्या कामासाठी पाणी उपलब्धता, गौण खनीज परवानग्या व इतर आवश्यक परवाने याबाबत आढावा घेतला गेला.
जेथे गरज तेथे होणार गाळ उपसा
छोटे बंधारे, धरण तलावातील गाळ काढण्यासाठी सुरू असलेल्या कामाचा आढावादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला. यावेळी त्यांनी ठेकेदार करीत असलेल्या कामकाजाची माहिती घेतली असता ठेकेदार हे आपल्या सोयीने गाळ काढण्याचे काम करतात. मात्र त्यातून अपेक्षित काम होताना दिसत नाही. ज्या ठिकाणी गाळ काढल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता वाढू शकते अशी यादी ठेकेदारांना दिली जाणार असून, त्यानुसारच ठेकेदारांनी गाळ काढणे अपेक्षित आहे. या संदर्भातील सूचना ठेकेदारांनादेखील दिल्या जाणार आहेत.

Web Title:  Discussion on redressing the richness in the assessment meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.