बंदीजनांच्या पुनर्वसनावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:11 AM2021-01-10T04:11:42+5:302021-01-10T04:11:42+5:30
महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या सामंजस्य करारानुसार, गेल्या चार वर्षांपासून बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प कार्यरत ...
महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग व टाटा ट्रस्ट यांच्या सामंजस्य करारानुसार, गेल्या चार वर्षांपासून बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प कार्यरत आहे. प्रकल्पांतर्गत बंद्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक मदत, तत्काळ मदत, बंदी पुनर्वसन, कायदे व आरोग्यविषयक, व्यावसायिक प्रशिक्षण व इतर घटकांवर काम करण्यात येते. त्या निमित्ताने ही आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये नाशिक जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी, जिल्हा महिला बाल कल्याण समिती सदस्य, जनशिक्षण संस्थान, हिरे दंत महाविद्यालय, दिशा फाउंडेशन, जयराम हॉस्पिटल, शिसोदे हेल्थ केअर सेंटर, संकल्प हेल्थ फाउंडेशन, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव, तसेच कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ कारागृह अधिकारी अशोक कारकर, निंबाळकर, महिला विभाग तुरुंग प्रमुख संतोषी कोळेकर आदी उपस्थित होते.