‘ग्रामीण विकासाची संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:57 PM2018-12-31T18:57:38+5:302018-12-31T18:58:01+5:30
सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन करण्यात आले.
सिन्नर : ग्रामीण भागातील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांच्यात प्रचंड निराशा आहे. शासकीय व अशासकीय संस्थांनी पुढाकार घेवून ग्रामीण भागात शाश्वत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मविप्रचे इगतपुरी तालुका संचालक भाऊसाहेब खताळे यांनी केले.
सिन्नर महाविद्यालयात पुणे विद्यापीठ आणि वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘ग्रामीण विकास संधी आणि आव्हाने’ विषयावरील राज्यस्तरीय चर्चा सत्राचे उद्घाटन खताळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर डॉ. एस. बी. श्रीवास्तव, प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, उपप्राचार्य आर. व्ही. पवार, एस. के. गायकवाड, डॉ. पगार आदी उपस्थित होते. विकास ही फक्त शहरी भागाची मक्तेदारी नसून शासन, शैक्षणिक संस्था अशासकीय संघटना आणि स्वयं मदत संघ यांनी ग्रामीण भागाचा विकास करणे आवश्यक आहे असे मत प्राचार्य डॉ. शिंदे यांनी प्रास्तविकात व्यक्त केले. स्वार्थीच्या पलिकडे जाऊन समस्येच्या मुळाशी जाण्याची तयारी आसल्यास ग्रामीण विकास शक्य आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या ग्रामीण भागातील असंतोष दर्शवितात असेही ते म्हणाले. चर्चास्त्राच्या उद्घाटन बिजभाषणात ते बोलत होते. जलसंधारण, आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधांबरोबरच शेतीतील नवनवीन तंत्राचा वापर आणि स्पर्धात्मक बाजारपेठा केल्यास ग्रामीण विकास निश्चित होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले. योगेश भारस्कार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष दळवी यांनी आभार मानले.