नाशिक तालुक्याच्या प्रश्नांवर शरद पवार यांच्याशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:31+5:302021-06-19T04:10:31+5:30
मुंबईत झालेल्या या भेटीत आमदार आहिरे यांनी विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली येथील शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर श्री व्यंकटेश ...
मुंबईत झालेल्या या भेटीत आमदार आहिरे यांनी विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली येथील शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानचे नाव आहे. ते इनाम वर्ग तीन व भोगवटदार २ हे शेरे कमी करावेत, अशी सुमारे पाच हजार शेतकऱ्यांची मागणी असून, गेल्या ४६ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांचा विकास खुंटला आहे. या गावातील देवस्थान वर्गबाबत शासनस्तरावर चुकीचा अर्थ लावला जात असल्याने देवस्थान उल्लेख असलेली जागा विकसित करता येत नसल्याचे सांगितले तसेच एकलहरा येथील विद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावा. कामगारांनी अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलनही केले आहेत. कामगारांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी तसेच वीजनिर्मितीचेही सातत्य कायम राखण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करावा तसेच पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू करावा, अशी मागणीही केली.
यावेळी लवकरच या प्रश्नांबाबत शासनस्तरावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिल्याचे आमदार आहिरे यांनी सांगितले.