एकलहरे प्रकल्पप्रश्नावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:05 AM2018-12-11T01:05:37+5:302018-12-11T01:06:01+5:30
नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा येथील मारु ती मंदिरात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे होते.
एकलहरे : नाशिक तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता मेळावा येथील मारु ती मंदिरात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पक्षाचे प्रदेश निरीक्षक रवींद्र पवार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, मोहन निंबाळकर, बाळासाहेब म्हस्के, दीपक वाघ, निवृत्ती अरिंगळे, गंगाधर धात्रक, प्रशांत म्हस्के, रामदास पाटील डुकरे, शानू निकम, संतू जगताप, राजू बिल्लाड, सुदाम ताजनपुरे, बाळासाहेब पवळे, लक्ष्मण मंडाले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देवळाली मतदारसंघांतर्गत एकलहरे गटातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. गटप्रमुख, गणप्रमुख, गावप्रमुख, वॉर्डप्रमुख यांच्या नियुक्त्या करून त्यांच्या कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात आली. यावेळी राजाराम धनवटे, विष्णुपंत म्हैसधुने, आसाराम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शानू निकम यांनी एकलहरे प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करून हा प्रकल्प इतरत्र न हलविता आहे त्या जुन्या संचांचे नूतनीकरण करण्याविषयी बोला, असा आग्रह धरला. तसे निवेदनही देण्यात आले. एकलहरे प्रकल्पाचा मुद्दा वरिष्ठांच्या कानावर घालून वेळ पडल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा मुंबईहून आलेले प्रदेश निरीक्षक रवींद्र पवार यांनी दिला. कार्यक्रमास एकलहरे परिसरातील रहिवासी व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन रामदास पाटील यांनी केले. आभार आसाराम शिंदे यांनी केले.