वीज कर्मचारी पतसंस्थेच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:53 AM2019-12-17T00:53:30+5:302019-12-17T00:53:57+5:30
महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभासदांच्या सहकारी पतसंस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रम ठरविण्याबाबत बैठक घेण्यात येऊन संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
एकलहरे : महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन सभासदांच्या सहकारी पतसंस्थेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने त्यानिमित्ताने वर्षभर आयोजित करण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रम ठरविण्याबाबत बैठक घेण्यात येऊन संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला.
नाशिक जिल्ह्यातील वीज कर्मचारी सभासदांची संख्या एक हजाराच्या जवळपास आहे. संस्थेच्या वतीने मुलांचे उच्च शिक्षण, स्वत:चे घर अथवा प्लॉट घेण्यासाठी, मुला-मुलींच्या लग्नासाठी पाच ते दहा लाखांपर्यंतची मदत केली जाते.
संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी व्ही. डी. धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरचिटणीस अरुण म्हस्के, सुभाष काकड, पंडितराव कुमावत, डी. आर. दाते, दत्ता चौधरी, बाळासाहेब गोसावी, भास्कर लांडगे, शरद देवरे, दीपक गांगुर्डे उपस्थित होते. यावेळी संस्थेचा सुवर्णमहोत्सव दिमाखात व थाटामाटात साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरले. कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित करणे, नाशिक शहरातून शोभायात्रा काढणे, श्रमिक-कष्टकरी चळवळीतील शाहिरी गीतांचे आयोजन, सन १९८१ पासून संस्थेवर कामकाज केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार, सभासदांना भेटवस्तू देणे या विविध विषयांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. बैठकीस नरेंद्र कांबळे, एम. एन. लासुरकर, दिलीप घोडे, रोहिदास पवार, आर. जी. ताजनपुरे, बाजीराव सगभोर, महेश पाचपांडे, प्रमोद घुले, पी. एस. डोळस, एस. के. भोर, एस. आर. मालुंजकर, उत्तम गांगुर्डे, बापू गोराणे, श्रीमती ए. एस. काशिद यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्याचबरोबर अपघात किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना आठ लाखांची मदत, दीर्घ आजाराने सभासदाचा मृत्यू झाल्यास एक लाखाची मदत देण्यात येते. आर्थिक दुर्बल घटकातील शालेय मुला-मुलींना गणवेश, दप्तर, पुस्तके, शालेय साहित्यासाठी शंभर मुला-मुलींसाठी एक लाखांचा निधी खर्च केला जातो.