बाजार समितीच्या सभेत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:50 PM2018-08-03T23:50:04+5:302018-08-04T00:22:59+5:30
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवारी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेत मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ चे खर्चपत्रक मंजूर करण्यात आले. नाशिक तालुका शेतकी सहकारी संघाने मागितलेल्या जागेविषयी बाजार समितीला फायदा होणार असल्याने जागा देण्यास सर्वानुमते संमती देण्यात आली. रात्रपाळी सुरक्षा कामाच्या मक्त्यात १० टक्के वाढ करण्यात आली. सर्व्हिस टॅक्सबाबत समितीने केलेल्या अपिलाचा निकाल विरोधात लागल्याने पुन्हा एकदा अपिलात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. आयकर विभागाने पाठविलेल्या नोटीसनुसार अडीच लाख रुपये भरण्याला मंजुरी देण्यात आली. उपसमित्या नियुक्तीचा अधिकार सभापती चुंभळे यांना देण्यात आला.
सर्वसाधारण सभेला उपसभापती संजय तुंगार, दिलीप थेटे, संपत सकाळे, विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, रवींद्र भोये, जगदीश अपसुंदे, संदीप पाटील, भाऊसाहेब खांडबहाले, श्याम गावित, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, विमल जुंद्रे, तारा माळेकर, रुची कुंभारकर, प्रवीण नागरे, हेमंत खंदारे, सचिव अरुण काळे आदी उपस्थित होते.