दिव्यांगांच्या समस्यांवर बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:28+5:302021-02-16T04:16:28+5:30
या बैठकीत दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळणे व त्यासाठीची उपाययोजना याबाबतच्या तरतुदी दिव्यांग अधिनियम कायदा ...
या बैठकीत दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळणे व त्यासाठीची उपाययोजना याबाबतच्या तरतुदी दिव्यांग अधिनियम कायदा २०१६ नुसार शासकीय कार्यालयांमध्ये हवेत, अशी महत्त्वाची सूचना व संकल्पना बैठकीत मांडण्यात आली. तसेच स्कुटर अँडाप्टर, श्रवणयंत्र, लॅपटॉप, वाहतूक भत्ता, सेवाजेष्ठता यादी, बिंदू नामावली या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. दिव्यांगांसाठी यूआयडी प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून मिळवून देण्यासाठी दिव्यांगांना सहकार्य करावे, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून दिव्यांग प्रमाणपत्र, यूआयडी कार्ड काढून देण्यास सुरुवात करण्यात यावी, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीस रणजित आंधळे, गिरीश पवार, प्रदीप पाटील, बाळासाहेब काळे, किशोर बच्छाव आदी उपस्थित होते.