रब्बी पिकांवर रोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:13+5:302020-12-15T04:31:13+5:30

मालेगाव तालुक्यात ९३.३४ टक्के रब्बी पिकांची लागवड केली जात आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची धुळधाण केली होती. रब्बीच्या ...

Disease invasion of rabi crops | रब्बी पिकांवर रोगांचे आक्रमण

रब्बी पिकांवर रोगांचे आक्रमण

Next

मालेगाव तालुक्यात ९३.३४ टक्के रब्बी पिकांची लागवड केली जात आहे. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची धुळधाण केली होती. रब्बीच्या पिकांवरच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. ढगाळ व रिमझिम पाऊस पडत असल्याने शेती पिकांवर रोगराई येण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाचा थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक बसण्याची शक्यता आहे. सध्या कांदा लागवड सुरू आहे. कांदा उळे (राेपे), शेंडे पिवळे पडू लागले आहेत. त्यांची वाढ खुंटणार आहे. तर कांदा पिकावरही करपा रोग येण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याला आलेली फुले गळण्याची शक्यता आहे. फुलोर अवस्थेत गाठी अळीचे आक्रमण झाल्यास हरभऱ्याच्या उत्पादनात प्रचंड घट हाेणार आहे. या रोगट वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिके वाचविण्यासाठी महागडी रासायनिक औषधे खरेदी करून पिकांवर फवारणी केली जात आहे. येत्या २ ते ३ दिवस वातावरण असेच राहिल्यास रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरीही चिंताक्रांत झाला आहे.

कोट....

बदलत्या वातावरणाचा रब्बी पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कांदा पिकावर करपा तर फुलोर अवस्थेतील हरभरा पिकाची फुले गळण्याची शक्यता आहे. हरभऱ्यावर गाठीअळीचे आक्रमण होऊ शकते. शेतकऱ्यांनी शेती तज्ज्ञांचे मत विचारात घेऊनच औषध फवारणी व उपाययोजना कराव्यात.

- बाळासाहेब व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी

ढगाळ व रोगट वातावरणामुळे रासायनिक औषधांची फवारणी करण्याचा खर्च वाढला आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम अतिवृष्टीने हिरावून नेला. तर रब्बीच्या प्रारंभीच ढगाळ व रोगट वातावरणामुळे पिके धोक्यात सापडली आहे. शेतकरी हतबल झाला आहे.

- बाळकृष्ण शेवाळे, शेतकरी

Web Title: Disease invasion of rabi crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.